मोदी सरकार आणतंय ‘ही’ खास योजना, पैसे खर्च न करता रस्ते अपघातातील जखमींवर होणार 2.5 लाख रूपयापर्यंतचे उपचार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अपघातग्रस्तांना कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी आता केंद्र सरकारकडून योजना करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक प्रकरणात कमाल मर्यादा अडीच लाख रुपये असेल. देशात दरवर्षी जवळपास पाच लाख अपघात होतात. अपघातग्रस्तांची आकडेवारी पाहता ही योजना महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

देशामध्ये दरवर्षी रस्ते अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू होते. तर तीन लाख लोक अपंग होतात. राज्य परिवहन सचिव तथा आयुक्त यांनी मंगळवारी पाठवलेल्या पत्रात रस्ते वाहतूक आणि राज्य रस्ते मंत्रालयाने असे म्हटले आहे की, कॅशलेस उपचारासाठी या योजनेंतर्गत मोटार वाहन अपघात निधी तयार केला जाईल. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये संसदेने मंजूर केलेल्या सुधारित मोटार वाहन कायद्यातील रस्ते निधीची स्थापना करण्यात आली आहे.

दिवसाला 1200 अपघात
अपघातग्रस्तांना कॅशलेस उपचार देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणची मजबूत आयटी पायाभूत सुविधा वापरली जाईल. भारतात रस्ते अपघातात दरवर्षी 1200 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू होतो. परिवहन मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात प्रत्येक दिवशी 1200 अपघातात 400 लोकांचा मृत्यू होतो.

मंत्रालयाच्या प्रस्तावात असे म्हटले आहे की, NHच्या मजबूत आयटी प्लॅटफॉर्मचा उपयोग रस्ते रहदारी अपघातातील पीडितांना कॅशलेस उपचार देण्यासाठी केला जाऊ शकतो. जर रुग्णालयाच्या रुग्णांना पीएमजेवाय रुग्णालयात पाठवले जाईल, तर रुग्णालयांना प्राथमिक उपचार करून किमान रुग्ण स्थिर करावे लागेल. जेणेकरून त्याच्यावर पीएमजेवाय रुग्णालयात सहज उपचार करता येतील.

रस्ते अपघातातील पीडितांसाठी अपघात आणि आरोग्य सेवांना खात्यातून पैसे दिले जातील. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी परिवहन मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापना केली जाईल. प्रस्तावात असे म्हटले आहे की, जर अपघात ग्रस्त वाहनाचा विमा नसेल तर उपचाराचे पैसे वाहन मालकांना द्यावे लागतील.