खुशखबर ! ‘या’ योजनेअंर्तगत छोट्या कर्जदारांचे कर्ज माफ करणार मोदी सरकार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लघु कर्जासंबंधित परेशान असणाऱ्या नागरिकांना तसेच उद्योगधारकांना मोदी सरकार लवकरच दिलासा देणार आहे. यासाठी मंदी सरकार नवी योजना आणणार असून याद्वारे लहान कर्ज असणाऱ्यांना माफी मिळणार आहे. इंसोल्वेंसी अँड बँकरप्सी कोडच्या (आईबीसी) नवीन नियमांनुसार आणि प्रावधानानुसार सरकार ही योजना आणण्याच्या प्रयत्नात आहे.

माइक्रो फायनांस इंडस्ट्री सोबत सुरु आहे चर्चा

खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, कॉर्पोरेट सचिव इंजेती श्रीनिवास यांनी म्हटले कि, आर्थिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या वर्गातील नागरिकांना कर्जातून मुक्त करण्यासाठी हि कर्जमाफीची योजना तयार केली आहे. यासाठी माइक्रो फायनांस इंडस्ट्री सोबत चर्चा सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. व्यक्तिगत कर्ज घेणाऱ्या व्यक्तींना कर्जातून बाहेर काढण्यासाठी ही योजना फार महत्वाची ठरणार आहे.

पाच वर्षातून एकदा मिळणार फायदा

याविषयी अधिक सांगताना त्यांनी म्हटले कि, जर तुम्ही सुरुवातीला या कर्जमाफीचा फायदा घेतला तर तुम्हाला पुढील पाच वर्ष याचा फायदा मिळणार नाही. या योजनेसाठी सरकार पुढील तीन ते चार वर्ष १० हजार कोटी रुपयांची तरतूद करणार आहे.

काय म्हणते आयबीसी

आयबीसीने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ६० हजारापेक्षा जास्त नसावे. त्याचबरोबर त्याचे कर्ज ३५ हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. त्याचबरोबर लाभार्थ्याकडे स्वतःचे घर देखील नसावे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी या सर्व अटींचे पालन करने गरजेचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like