‘हा’ व्यवसाय सुरू करण्यासाठी मोदी सरकार देणार 50 % रक्‍कम, ‘भरघोस’ कमाई करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही कोणता व्यवसाय सुरु करणार असला तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गोमातेच्या शेणापासून आणि गोमुत्रापासून तयार होणाऱ्या वस्तूंवर मोदी सरकार तुम्हाला मदत करणार आहे. या व्यवसायासाठी तुम्हाला लागणाऱ्या रकमेच्या अर्धी मदत केंद्र सरकार करणार आहे. त्यामुळे दुधाच्या पदार्थांबरोबरच शेण आणि गोमूत्रापासून बनणाऱ्या वस्तूंवर देखील सरकार जवळपास 60 टक्के मदत करणार आहे.

अर्थसंकल्पात राष्ट्रीय कामधेनु आयोगाची स्थापना –
1 फेब्रुवारी 2019 रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात सरकारने राष्ट्रीय कामधेनु आयोगाच्या स्थापनेला परवानगी दिली होती. त्याचबरोबर त्यामध्ये 500 कोटी रुपये देण्याची देखील घोषणा केली होती. या आयोगात प्राण्यांचे डॉक्टर, पशु विज्ञान अधिकारी तसेच कृषी विभागाच्या साहाय्याने काम केले जाईल. यामध्ये गाईंच्या प्रजनन, पालन आणि विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

औषध आणि कृषी क्षेत्रांत वापर –
इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, सरकार गोमातेच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून तयार होणाऱ्या वस्तूंवर तुम्हाला मदत करणार आहे. या व्यवसायासाठी तुम्हाला लागणाऱ्या रकमेच्या अर्धी मदत केंद्र सरकार करणार आहे. त्यामुळे युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याची माहिती काऊ बोर्डाचे चेअरमन वल्लभ कठेरिया यांनी दिली.

गोशाळा चालवणाऱ्याला ट्रेनिंग –
कठेरिया यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले कि, दूध देणे बंद करणाऱ्या गाईंची विक्री करण्याऐवजी त्यांच्या गोमूत्रापासून आणि शेणापासून आपण विविध बाय प्रॉडक्ट्स बनवू शकतो. त्याचा उपयोग औषधीय पदार्थांमध्ये तसेच औषधांमध्ये देखील होणार आहे. त्याचबरोबर ज्यांच्याकडे आधीपासूनच गोशाळा आहे त्यांना आम्ही प्रशिक्षण देणार असून त्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाणार आहे.

आरोग्यनामा ऑनलाइन –