खुशखबर ! मोदी सरकार देणार विना ‘गॅरंटी’ २० लाख रुपयांचं ‘कर्ज’ !, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही तुमचा व्यवसायाय सुरु करु इच्छित असाल तर आता मोदी सरकार तुम्हाला विना गारंटी कर्ज देणार आहे. मोदी सरकार आता मुद्रा योजने अंतर्गत आता व्यवसाय सुरु करण्यासाठी विना गारंटी २० लाख रुपयांचे कर्ज देणार आहे. यात आधी १० लाख रुपये कर्ज देण्यात येत होते. मात्र केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी लोकसभेत विचारलेल्या एक प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, MSME साठी तयार करण्यात आलेल्या आरबीआयच्या समितीने ही शिफारस केली आहे.

या समितीने रिजर्व बँकेला आपला आवाहल सादर केला. या आवाहलात MSME ला २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची शिफारस करण्यात आली. तर समितीने मुद्रा लोनची मर्यादा १० लाख रुपयांवरुन २० लाख वाढवण्याची शिफरस केली.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग कमी झाला आहे. ज्यातून कमी रोजगार निर्मिती होत आहे. यासाठी आयबीआय समितीने परिस्थिती पाहून ही सूचना केली आहे.

काय आहे मुद्रा योजना
योजनेची सुरुवात २०१५ साली करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश्य आहे की छोट्या उद्योजकांना कोणत्याही गारंटी शिवाय कर्ज देण्यात यावे. कोणीही व्यवसायिक कर्ज घेऊ इच्छित असेल तर या योजनेच्या माध्यमातून ते कर्ज घेऊ शकतात. जर तुम्ही तुमचा व्यवसाय, उद्योग वाढवू इच्छितात तर देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आधी तुम्ही १० लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी अर्ज करु शकत होता मात्र आता २० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

मुद्र योजने अंतर्गत याआधी देण्यात येते ३ प्रकारे कर्ज
१. शिशु लोन (लहान कर्ज) – ५०,००० रुपये
२. किशोर लोन (मध्यम स्वरुपाचे) – ५०,००० ते ५ लाख रुपये
३. तरुण लोन (मोठे कर्ज) – ५ ते १० लाख रुपये

आरोग्यविषयक वृत्त