रेल्वे, पोस्ट ते EPFO पर्यंत, जाणून घ्या कोणत्या कर्मचार्‍यांना मिळणार किती बोनस

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – केंद्र सरकारने बुधवारी 30 लाखाहून अधिक कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस देण्याची मोठी घोषणा केली होती. या माध्यमातून लोकांना एकूण 3,737 कोटी रुपयांचा बोनस मिळेल. कर्मचाऱ्यांना हा बोनस कधी व केव्हा मिळेल, हा प्रश्न आहे.

कसा व किती मिळेल बोनस
सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय रेल्वे, पोस्ट, संरक्षण, ईपीएफओ आणि ईएसआयसीसह अन्य व्यवसायिक संस्थांच्या 16.97 लाख नॉन-राजपत्रित (विना राजपत्रित) कर्मचार्‍यांना बोनस देण्यात येईल. यामुळे सरकारवर 2,791 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.

13.70 लाख कर्मचाऱ्यांनाही
त्याचबरोबर केंद्र सरकारच्या 13.70 लाख कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येणार आहे. यामुळे सरकारवर 946 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.

एकूण 3737 कोटी रुपयांचा आर्थिक भार
अशा प्रकारे एकूण 30.67 लाख कर्मचार्‍यांना बोनसचा लाभ मिळेल आणि सरकारला एकूण 3737 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.

थेट बँक खात्यात
केंद्र सरकारचा हा बोनस थेट सरकारी कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) मार्फत ट्रान्सफर केला जाईल. एका आठवड्यात कर्मचार्‍यांना बोनस देण्यात येईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

हेतू काय आहे
केंद्र सरकारचा असा विश्वास आहे की, सणांच्या वेळी खर्च करण्यासाठी कर्मचार्‍यांना प्रोत्साहित केले जाईल आणि यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेत मागणी वाढेल. अर्थव्यवस्थेच्या मंदीमध्ये सरकार मागणी वाढविण्यावर भर देत आहे.