फायद्याची गोष्ट ! मोदी सरकार बेरोजगारांना देणार नोकरीचं ‘फ्री’मध्ये ‘ट्रेनिंग’, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात अर्ध्यावर शिक्षण सोडलेल्या लोकांची संख्या अधिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पैशांचा अभाव. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक लोकांना आपले शिक्षण पूर्ण करता येत नाही. अशा लोकांसाठी मोदी सरकारने नवीन योजना आणली आहे.

मोदी सरकारने तरुणांना रोजगार देण्याचे प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. जे कमी शिक्षित आहेत किंवा त्यांचे शिक्षण पूर्ण झाले नाही त्यांना सरकारी रोजगार देण्यासाठी ‘पंतप्रधान कौशल्य विकास योजने’ अंतर्गत प्रशिक्षण दिले जात आहे. यात शासनाकडून मानधन म्हणून तरूणांना सुमारे 8 हजार रुपये दिले जातात. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्रही देण्यात येते, जे देशभर वैध आहे.

असा करा अर्ज –

pmkvyofficial.org वेबसाईटवर जा आणि आपले नाव, पत्ता आणि ईमेल भरा. त्यानंतर फॉर्म भरा.
फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहेत. फॉर्म भरल्यानंतर ज्या तांत्रिक क्षेत्रात प्रशिक्षण घ्यायचे आहे ते निवडावे. पीएमकेव्हीवायला प्राधान्य असलेल्या तांत्रिक क्षेत्राचे अतिरिक्त तांत्रिक क्षेत्र देखील निवडावे लागेल. ही माहिती भरल्यानंतर प्रशिक्षण केंद्र निवडावे लागेल.

या योजनेंतर्गत अर्ज नोंदणीची ही प्रक्रिया तिमाही, सहामाही आणि वार्षिक अंतराने केली जाते. सेक्टर स्किल कौन्सिलमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. यात उमेदवार उत्तीर्ण झाल्यास शासकीय प्रमाणपत्र आणि कौशल्य कार्ड दिले जाते. यामुळे त्यांना रोजगार मिळविणे सोपे होते.

या अभ्यासक्रमांसाठी प्रशिक्षण दिले जाते –

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर, फूड प्रोसेसिंग, फर्निचर, फिटिंग्ज, हस्तकला, रत्न व दागिने व चामड्याचे तंत्रज्ञान सुमारे 40 तांत्रिक अभ्यासक्रम आहेत. या लोकांना नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. पीएमकेव्हीवाय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एसएससीचे मूल्यांकन मंजूर एजन्सीद्वारे केले जाईल. मूल्यांकन पास केल्यास शासकीय प्रमाणपत्र आणि कौशल्य कार्ड मिळेल.

आरोग्यविषयक वृत्त –