देशातील नागरिकांना आरोग्य ID कार्ड देणार मोदी सरकार, लवकरच होऊ शकते घोषणा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनची घोषणा करू शकतात. या योजनेंतर्गत प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याचा डाटा एका प्लॅटफॉर्मवर असेल. याशिवाय प्रत्येकाचे हेल्थ आयडी कार्ड तयार केले जाईल. या डाटामध्ये डॉक्टरच्या डिटेल्ससह देशभरातील आरोग्य सेवांची माहिती उपलब्ध असेल. ज्याद्वारे एकाच प्लॅटफॉर्मवर आरोग्याशी संबंधीत सर्व माहिती उपलब्ध असेल. स्कीमशी संबंधीत नॅशनल हेल्थ अथॉरिटीचे सीईओ इंदु भूषण यांनी ही माहिती दिली आहे.

भूषण यांनी म्हटले की, या योजनेत विशेषकरून चार गोष्टींवर फोकस केला जाईल, आरोग्य आयडी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड, खासगी डॉक्टर, आणि हेल्थ फॅसिलिटीजचा रेकॉर्ड. नंतर या मिशनमध्ये टेलीमेडिसिन सेवांना जोडले जाईल. यामध्ये हेल्थ आयडी कार्ड धारकांची माहिती गोपनिय ठेवली जाईल. हा एैच्छिक प्लॅटफॉर्म आहे. यात सहभागी होण्याचे बंधन नाही. कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्याची माहिती त्याच्या सहमतीनेच घेतली जाईल. अशाच प्रकारे डॉक्टर आणि हॉस्पिटलची सहमती घेऊन त्यांची माहिती घेतली जाईल.

सहमतीशिवाय अन्य कुणी पाहू शकत नाही डाटा
भूषण यांनी माहिती दिली की, हे हेल्थ कार्ड तयार झाल्यानंतर जर कुणी डॉक्टरांकडे उपाचारासाठी गेले तर त्यांच्या सहमतीने डॉक्टर त्याचा रेकॉर्ड ऑनलाइन पाहू शकतात. यासाठी सिस्टम तयार करण्यात येत आहे. अन्य कुणी हा डाटा सहमतीशिवाय पाहू नये यासाठी मोबाइलवर वन टाइम पासवर्डसारखी सुविधा दिली जाऊ शकते. एखाद्याने जर आपली हेल्थ टेस्ट केली असेल तर त्याची डिटेल्स सुद्धा एका ठिकाण ऑनलाइन उपलब्ध असेल, डॉक्टर ती पाहू शकतात.

गरीबांना मोफत विमा कव्हर योजना
आरोग्य समस्यांसाठी प्रधानमंत्री जन अरोग्य योजना किंवा आयुष्मान भारत योजनेतून गरीबांना मोफत उपचार दिले जात आहेत. ही जगातील सर्वात मोठी आणि पूर्णपणे सरकारी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेचे लक्ष्य 10.74 कोटी गरीब आणि वंचित कुटुंबांना आरोग्य विमा कक्षेत आणणे हे आहे. याअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वार्षिक 5 लाखांचे विमा कव्हर मिळेत, ज्यामध्ये 1400 पूर्व-निर्धारित पॅकेजचा समावेश आहे.