नवीन वर्षात करा सेविंगचा संकल्प ; पोस्टाच्या सुपर योजना 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन वर्षात अनेकजण सेविंग करायचा संकल्प करतात पण काही कारणास्तव हा संकल्प पूर्णत्वास जात नाहीत. पण यावर्षी पोस्टाच्या योजनांद्वारे तुमचा नववर्ष बचतीचा संकल्प नक्की पूर्णत्वास जाऊ शकतो. केंद्रातील मोदी सरकारनं पोस्टाच्या योजनांवरचा व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशांतील व्याजदरात मोदी सरकारनं ०.१० टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळेच आपल्याला जास्त नफा मिळणार आहे. सरकार छोट्या बचत योजनांसाठी प्रत्येक तिमाहीत व्याजदर निश्चित करते. विशेष म्हणजे पोस्टात तुम्ही छोटी छोटी रक्कमही गुंतवू शकता आणि त्यावर व्याजाच्या स्वरूपात मोठी रक्कम कमावू शकता. सरकारी योजना असलेल्या पीपीएफचेही अनेक फायदे आहे.

पोस्टाची मुदत ठेव
पोस्टात तुम्ही चार प्रकारे ठेवी ठेवू शकता. एक वर्ष, दोन वर्षं, तीन वर्षं आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. एक वर्षातील मुदत ठेवीवर ६.६ टक्के व्याज मिळतं, तर दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर ६.७ टक्के व्याज मिळतं. तीन वर्षीय पोस्टाच्या ठेवींवर ६.९ टक्के व्याज दिलं जातं. तर पाच वर्षांसाठी ठेवलेल्या रकमेवर ७.४ टक्के व्याज मिळतं. याच गुंतवणुकीवर आपल्याला नव्या व्याजदरानुसार फायदा मिळणार आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांसाठी ठेवलेल्या ठेवींवर प्राप्तिकर कायदा ८० सीअंतर्गत सूटही दिली जाते. त्यामुळे या पैशांवर कोणताही कर लागत नाही.

पोस्टात पीपीएफ खाते सुरु करणे फायद्याचे
पीपीएफचं खातं तुम्हाला१०० रुपयांमध्ये उघडता येते. यात आर्थिक वर्षामध्ये एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर लाभ मिळतो. यातील जमा रकमेवर ८ टक्के व्याज दिलं जातं. खातेधारकांना आपल्या खात्यात ५०० रुपये आणि जास्त करून १.५० लाख रुपये जमा करावे लागतात. तसेच खात्याची मर्यादा १५ वर्षांसाठी आहे. यात तुम्ही संयुक्त अकाऊंटही उघडू शकता. तुम्हाला या योजनेत नॉमिनेशनची सुविधाही मिळते. यात एका वित्त वर्षात तुम्हाला एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळतो.

जेष्ठ नागरिकांसाठी खास योजना
६० वर्षं वयाची व्यक्तीही या योजनेत खातं उघडू शकते. ५५ ते ६० वर्षं वयाच्या व्यक्ती निवृत्तीच्या तीन महिने आधीही या योजनेत खातं खोलून पैसे गुंतवू शकतात. खातं उघडल्यानंतर तुम्हाला कमीत कमी १००० रुपये जमा ठेवावे लागतात. या खात्यात तुम्ही जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमवू शकता. ज्यावर तुम्हाला वर्षाला ८.७ टक्के व्याज मिळते. या योजनेची मर्यादा पाच वर्षांची असते. डिसेंबर २०१८ च्या तिमाहीत वरिष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्हाला प्रतिवर्ष ८.७ टक्के व्याज मिळते. वरिष्ठ नागरिक बचत योजनेवर व्याज ३१ मार्च / ३० सप्टेंबर / ३१ डिसेंबरला जमा करण्याच्या तारखेपासून लागू आहे. त्यानंतर ३१ मार्च, ३० जून, ३० सप्टेंबर, ३१ डिसेंबरपर्यंत जमा रकमेवर व्याज मिळणार आहे. डिसेंबरमध्ये समाप्त होणा-या तिमाहीसाठी पीपीएफमध्ये जमा असलेल्या रकमेवर प्रतिवर्षी ८ टक्के व्याज मिळत होते. आता त्यात ०.१० टक्क्यांची वाढ झाली आहे. दरवर्षी ६००० रुपयांची बचत केल्यास १५ वर्षांनी मुदत संपल्यावर १.७ लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात. खात्रीशीर व्याज देणारा आणि सुरक्षित पर्याय तसेच तरुण मुला-मुलींनी बचत सुरू करण्यास प्रारंभीच्या टप्प्यात पीपीएफचा पर्यायाचा विचार केला पाहिजे. जितक्या लवकर बचत सुरू करता येईल तितके चांगले फायदे आपल्याला मिळतात.

सोनिया गांधी यांनीच अमित शहा यांना सोहराबुद्दीन प्रकरणात गुंतवले – स्मृती इराणी
दोन महिलांनी पतीला घटस्फोट देऊन केलं एकमेकींशीच लग्न
पाठिंब्यासाठी सेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी केली होती चर्चा : रामदास कदम यांचे वक्तव्य
दोन्ही पाटलांनी पहाटेपासूनच ठोकला होता कोरेगाव भीमा मध्ये तळ