मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला ‘स्पीड’, शिवसेनेनं ‘साथ’ सोडल्यानं BJP जोडणार ‘हा’ नवा पक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडली आणि एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र सध्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध भाजपला लागले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. विशेष म्हणजे या विस्तारामध्ये नितीन कुमारांचा जेडीयू पक्ष सामील होणार आहे. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा वाईएसआर कांग्रेसला देखील एनडीएत घेण्याच्या हालचाली सुरु असल्याचे समजते.

नागरी सुधारणा विधेयकावेळी टीडीपी पक्षाने देखील भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता यासाठी टीडीपीकडून विधेयकाला पाठींबा देखील देण्यात आला होता. पुढील वर्षी बिहारमध्ये होणाऱ्या निवडणूका लक्षात घेऊन जेडीयूने देखील भाजपच्या विधेयकाला पाठींबा दर्शवला होता त्यामुळे आता मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी जेडीयू देखील तयार असल्याचे समजते.

नरेंद्र मोदी सरकार एनडीएमध्ये काही नवीन पक्षांना घेऊन मंत्रिमंडळ विस्तार करणार आहे. तसेच रामविलास पासवान यांच्या मुलाला देखील राज्य मंत्रिपदाचा दर्जा दिला जाऊ शकतो तर रामविलास पासवान यांना एनडीएच्या पदामध्ये नियुक्त केले जाऊ शकते. शिवसेनेने मोदी सरकारकडून दूर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोदी सरकारने इतर घटक पक्षांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांच्यात मोठा सत्तासंघर्ष पहायला मिळाला त्यानंतर शिवसेनेने एनडीएला रामराम ठोकला होता. भाजपच्या लक्षात ही बाबा येताच भाजपने इतर स्थानिक पक्षांना संवाद साधून समतोल राखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता एनडीएत नवीन पक्षांची एंट्री होऊ शकते. ज्यामध्ये  काँग्रेसचे नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/