वृध्दांसाठी मोदी सरकारची ‘खास’ स्कीम ! ‘या’ उत्पन्नांवर नाही लागणार कोणताही TAX, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने करांच्या नियमात अनेक मोठे बदल केले होते. या बदलांनुसार, सरकारने नवीन कलम 80 TTB समाविष्ट केले. यामध्ये वयोवृद्धांना 50,000 रुपयांपर्यंतच्या व्याज उत्पन्नावर करात सूट मिळते. म्हणजेच जर एफडी, आवर्ती ठेव किंवा बचत खात्यातून कोणतेही व्याज प्राप्त झाले तर 50,000 रुपयांपर्यंत कोणताही कर भरला जाणार नाही.

दरम्यान, जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने 80 TTB अंतर्गत कर सवलतीचा लाभ घेतला तर त्याला 80 TTA अंतर्गत कोणताही लाभ मिळणार नाही. केवळ ज्येष्ठ नागरिकांना 80 TTB चा लाभ मिळेल. इतर करदात्यांना किंवा एचयूएफला याअंतर्गत कोणतीही कर सूट मिळणार नाही. साधारणत: 80 TTA अंतर्गत कोणत्याही करदात्यांना 10,000 रुपयांपर्यंतच्या व्याज उत्पन्नावर कर सूट मिळण्याचा लाभ मिळतो.

80 TTB आणि 80 TTA मधील मूलभूत फरक
80 TTB – हे सर्व करदात्यांसाठी आहे. ज्येष्ठ नागरिकांनी 80 TTB ची निवड केल्यास त्यांना 80 TTA लाभ मिळणार नाही. यामध्ये तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंतच्या व्याज उत्पन्नावरील कर सूटचा लाभ मिळेल. पोस्ट ऑफिस आणि बचत खात्यातून मिळणार्‍या व्याज उत्पन्नावर सूट मिळू शकेल.

80 TTA – ही योजना केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. यात जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंतचे व्याज उत्पन्न सूट देण्यात येईल. एफडी, आवर्ती ठेव आणि बचत खात्यातून मिळणार्‍या व्याज उत्पन्नावर सवलत मिळेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/