PM Kanya Ashirwad Yojana | सरकार पंतप्रधान कन्या आशीर्वाद योजनेंतर्गत मुलींना खरंच 2000 रुपये देत आहे का? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PM Kanya Ashirwad Yojana | काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज वायरल होत आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, सरकार ‘पंतप्रधान कन्या आशीर्वाद योजना’ (PM Kanya Ashirwad Yojana) अंतर्गत मुलींना दरमहिना 2000 रुपये देत आहे. या मेसेजची सत्यता जाणून घेवूयात…

Youtube चॅनलवर केला दावा

एका यूट्यूब चॅनलवर एका व्यक्तीने हा दावा केला आहे की, पंतप्रधान कन्या आशीर्वाद योजनेंतर्गत मुलींच्या खात्यात मोदी सरकार दर महिना 2000 रुपये ट्रान्सफर करणार आहे.

सरकारने म्हटले मेसेज बनावट

पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट करून या वृत्ताची सत्यता सांगितली आहे.
पीआयबीने आपल्या ट्विटद्वारे लोकांना सावध केले आहे की, सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही आणि हा मेसेज पूर्णपणे बनावट आहे.

तुम्ही सुद्धा करू शकता फॅक्टचेक

जर तुम्हाला असा मेसेज मिळाला तर तो पीआयबीकडे फॅक्ट चेकसाठी https://factcheck.pib.gov.in/ किंवा व्हॉट्सअप नंबर +918799711259
किंवा ईमेल : [email protected] वर पाठवू शकता.
ही माहिती पीआयबीच्या वेबसाइट https://pib.gov.in वर सुद्धा उपलब्ध आहे.

 

Web Title :  modi govt give rs 2000 every girl under pradhan mantri kanya ashirwad yojana check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | कॉर्पोरेट ट्रेनिंग देणाऱ्या व्यावसायिक महिलेला फेसबुकवरील मैत्री पडली 30 लाखांना

Mumbai Cruise Drug Case | नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट ! म्हणाले – ‘भाजप नेत्याचा तो मेहुणा कोण?’

Pune Corporation | पुणे महापालिकेचा मोठा निर्णय ! कॉलेजमध्येच विद्यार्थ्यांना दिली जाणार कोरोना लस