खुशखबर ! मोदी सरकार शेतकर्‍यांना देतंय वार्षिक 42000 रुपये, जाणून घ्या तुम्हाला कसा मिळेल फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजर तुम्हाला सुद्धा दरमहिन्याला 3000 रुपयांचा फायदा हवा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आवश्यक आहे. केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ घेणार्‍या लाभार्थ्यांना वार्षिक 36 हजार रुपयांचा फायदा दिला जात आहे. जर तुम्ही सुद्धा पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला सुद्धा आता एकुण 42 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळेल. अखेर हे पेसे तुम्ही कसे मिळवू शकता ते जाणून घेवूयात.

पीएम किसान योजनेच्या PM Kisan Yojana लाभार्थ्यांना पीएम किसान मानधन योजनेचा फायदा मिळतो, ज्यामध्ये वार्षिक 36000 रुपये दिले जातात.
यासोबतच मानधन योजनेसाठी तुम्हाला कोणतीही वेगळी कागदपत्रे देण्याची आवश्यकता नसते.

कसे मिळतील 42000 रुपये
पंतप्रधान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यात दर महिन्याला 3000 रुपये येतात म्हणजे वार्षिक 36,000 रुपये मिळतील.
तर, पीएम किसान योजनेंतर्गत, PM Kisan Yojana शेतकर्‍यांना 2,000 रुपये तीन हप्ते दरवर्षी मिळतात म्हणजे त्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात.
जर एखाद्या शेतकर्‍याला या दोन्ही योजनांचा लाभ मिळत असेल तर त्यास दरवर्षी 42000 रुपये सरकारकडून मिळतील.

कोण घेऊ शकतात लाभ
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत 18 ते 40 वर्षापर्यंतच्या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळेल.
परंतु अट ही आहे की, शेतकर्‍याकडे स्वताची किमान 2 हेक्टर शेतजमीन असावी.
त्यांन दर महिन्याच्या हिशेबाने 55 रुपयांपासून 200 रुपयांचाच प्रीमियम जमा करावा लागेल.

किती द्यावा लागेल प्रीमियम

जर 18 वर्षाच्या वयात जोडले गेलात तर मासिक अंशदान 55 रुपये दरमहिना होईल.
याशिवाय जर तुम्ही 30 वर्षाच्या वयात या योजनेत जोडले गेला तर तुम्हाला वार्षिक 110 रुपये प्रीमियम द्यावा लागेल.
जर तुम्ही 40 वर्षाच्या वयात या योजनेचा लाभ घेतला तर 200 रुपये प्रीमियम द्यावा लागेल.

मानधन योजना एक प्रकारची पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये छोट्या आणि भूमिहिन शेतकर्‍यांना दर महिन्याला पेन्शन दिली जाते.
ही पेन्शन शेतकर्‍यांना 60 वर्षाच्या वयानंतर दिली जाते.

COVID-19 in India : देशात 63 दिवसानंतर एक लाखापेक्षा कमी कोरोना केस, एकुण मृत्यूंचा आकडा 3.5 लाखांच्या पुढे

प्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 

wab title : modi govt giving 42k rupees annually for pm kisan beneficiaries how can you take this benefits