5 तासापेक्षा जास्त लागोपाठ काम करणार नाहीत कर्मचारी, 1 एप्रिलपासून मोदी सरकार बदलू शकते कामाचे तास आणि निवृत्तीचे नियम

नवी दिल्ली : 1 एप्रिल 2021 पासून तुमची ग्रॅच्युटी, पीएफ आणि कामाच्या तासात मोठा बदल पहायला मिळू शकतो. कर्मचार्‍यांची ग्रॅच्युटी आणि भविष्य निर्वाह निधी (पीएफ) मध्ये वाढ होईल. तर, हातात येणारे पैसे (टेक होम सॅलरी) कमी होतील. इतकेच नव्हे तर यामुळे कंपन्यांची बॅलन्स शीट सुद्धा प्रभावित होईल. मागील वर्षी संसदेत मंजूर तीन संहिता विधेयक (कोड ऑन वेजेस बिल) हे यामागील कारण आहे. ही विधेयके यावर्षी 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे.

वेज (मजूरी) च्या नव्या व्याख्येनुसार भत्ते एकुण सॅलरीच्या कमाल 50 टक्के असतील. याचा अर्थ असा आहे की, मूळ वेतन (सरकारी नोकरीत मूळ वेतन आणि महागाई भत्ता) एप्रिलपासून एकुण वेतनाच्या 50 टक्के किंवा जास्त असावे. सरकारचा दावा आहे की, मालक आणि कामगार दोन्हीसाठी हे लाभदायक ठरेल.

कामाचे तास 12 तासात बदलण्याचा प्रस्ताव
नव्या कायद्याच्या ड्राफ्टमध्ये कामाचे कमाल तास वाढवून 12 करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. ओएसच कोडच्या ड्राफ्टमधील नियमात 15 ते 30 मिनिटांदरम्यान जादा कामाला सुद्धा 30 मिनिटे मोजून ओव्हरटाइम समजण्याची तरतूद आहे. सध्या नियमात 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेला ओव्हरटाइम मानले जात नाही. ड्राफ्टमधील नियमात कोणत्याही कर्मचार्‍याकडून 5 तास सलग काम करून घेण्यास प्रतिबंध आहे. कर्मचार्‍यांना प्रत्येक पाच तासानंतर अर्धा तासाची विश्रांती देण्याचे निर्देश नवीन नियमात आहेेत.

यामुळे वेतन कमी होईल आणि पीएफ वाढेल
नवीन ड्राफ्ट रूलनुसार, मुळ वेतन एकुण वेतनाच्या 50% किंवा जास्त झाले पाहिजे. यामुळे बहुतांश कर्मचार्‍यांचे वेतन बदलेल, कारण वेतनाचा विना-भत्त्याचा भाग सामान्यपणे एकुण सॅलरीच्या 50 टक्केपेक्षा कमी असतो. तर एकुण वेतनात भत्त्यांचा भाग आणखी जास्त होऊ शकतो. मूळ वेतन वाढल्याने वेतन वाढेल. पीएफ मुळ वेतनावर अधारित असतो. मुळे वेतन वाढल्याने पीएफ वाढेल, ज्याचा अर्थ आहे की टेक-होम किंवा हातात येणार्‍या वेतनात कपात होईल.

रिटायरमेंटच्या रक्कमेत होईल वाढ
ग्रॅच्युटी आणि पीएफमध्ये योगदान वाढल्याने रिटायरमेंटनंतर मिळणार्‍या रक्कमेत वाढ होईल. यातून लोकांना रिटायरमेंटनंतर त्यांच्या पैशात सुखाने जीवन जगणे सोपे होईल. पीएफ आणि ग्रॅच्युटी वाढल्याने कंपन्यांच्या खर्चात वाढ होईल. कारण त्यांना सुद्धा कर्मचार्‍यांसाठी पीएफमध्ये जास्त योगदान द्यावे लागेल. या गोष्टींमुळे कंपन्यांची बॅलन्सशीट प्रभावित होईल.