ज्वेलर्ससाठी खुशखबर ! हॉलमार्किंग नोंदणीसंदर्भात सरकार करणार मोठी घोषणा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी आज 21 ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीआयएसद्वारे ज्वेलर्स आणि शुद्धता तपासणीसह हॉलमार्किंग केंद्रांच्या (ए आणि एच सेंटर) ऑनलाईन नोंदणीसाठी तयार केलेल्या मॉड्यूल्सचे अनावरण करणार आहे. पासवान यांनी ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार वेबसाइटवर नवीन वैशिष्ट्ये जोडली जातील. जेणेकरुन, व्यवसायीक घरीबसल्या सहजपणे हॉलमार्किंग करू शकतील. नवीन मॉड्यूलद्वारे व्यावसायिक सहजपणे ऑनलाइन नोंदणी करू शकतात. त्यांना त्वरित प्रमाणपत्र मिळेल. कागदपत्र पडताळणीसाठी वेळ दिला जाईल.

BIS-Care मोबाइल अ‍ॅपद्वारे होणार सोन्याची सत्यता
रामविलास पासवान यांनी काही दिवसांपूर्वी बीआयएस अ‍ॅप सुरू केले होते. या अ‍ॅपद्वारे सोन्याच्या वस्तूंची सत्यता तपासली जाऊ शकते. वस्तू, परवाना, नोंदणी व हॉलमार्कची पडताळणी यासंबंधी कोणत्याही तक्रारीची आता बीआयएस ॲपद्वारे चौकशी केली जाईल. या अ‍ॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित त्याबद्दल तक्रार देखील करू शकतो. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहिती मिळेल. हिंदी आणि इंग्रजीमध्ये काम करणारे हे ॲप कोणत्याही अँड्रॉइड फोनवर ऑपरेट केले जाऊ शकते आणि गुगल प्ले स्टोअर वरून विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते.