नवी दिल्ली : Modi Govt On Dearness Allowance | मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्यांना चांगलाच झटका दिला आहे. कोरोना काळात थांबवण्यात आलेला तब्बल 18 महिन्यांचा महागाई भत्ता (DA) हा केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिला जाणार नसल्याचं केंद्र सरकारनं लोकसभेत स्पष्ट केलं आहे. एका प्रश्नाचे लेखी उत्तर देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Pankaj Chowdhary) यांनी सांगितले की, केंद्रीय कर्मचारी (Central Government Employees) तसेच पेन्शनधारंकाना (Pensioners) महागाई भत्ता व महागाई मदतच्या (DR) 3 हप्त्यांची थकबाकी देण्याची सध्यातरी कोणतीही योजना नाही. केंद्राच्या कर्मचारी व पेन्शनर्सच्या वेगवेगळया संघटनांनी 18 महिन्यांचा डीए आणि डीआर देण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे अर्ज दिलेले आहेत, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री चौधरी यांनी सांगितलंय. (Modi Govt On Dearness Allowance)
कोरोना महामारीच्यावेळी केंद्र सरकारने कर्मचार्यांना महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना महागाई मदत देण्यास स्थगिती दिली होती. मंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 रोजी जारी करण्यात येणारा डीए बंद करण्याचा निर्णय कोरोनामुळे झालेल्या आर्थिक विस्कळीतपणामुळे घेण्यात आला होता. ज्यामुळे केंद्र सरकारवरील आर्थिक बोजा कमी होईल. केंद्र सरकारने याव्दारे 34,402.32 कोटी रूपयांची बचत केली होती. केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना काळात सरकारला अनेक कल्याणकारी योजनांसाठी भरपूर पैशांची तरतूद करावी लागली होती. त्याचा इम्पॅक्ट 2020-21 मध्ये आणि त्यानंतर देखील दिसून आला आहे. याबरोबरच सरकारने स्पष्ट केले आहे की, सध्या अर्थसंकल्पीय तूट एफआरबीएम कायद्यातील तरतुदींच्या तुलनेत डबल म्हणजेच दुप्पट आहे आणि म्हणूनच डीए देण्याचा प्रस्ताव नाही. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे देशातील कोटयावधी केंद्रीय कर्मचार्यांना चांगलाच झटका बसला आहे. (Modi Govt On Dearness Allowance)
दिवाळीपुर्वी वाढवला होता महागाई भत्ता
साधारण दिवाळीच्या महिनाभरापुर्वीच मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्यांना मोठं गिफ्ट दिलं होतं.
सरकारने केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 4 टक्क्यांची वाढ केली होती.
यापुर्वी केंद्रीय कर्मचार्यांना महागाई भत्ता हा 34 टक्के मिळत होता आता तो 38 टक्क्यांवर गेला आहे.
Web Title :- Modi Govt On Dearness Allowance | dearness allowance central govt employees will not get 18 months of da arrears stopped during covid 19
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MP Supriya Sule | खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा