मोदी सरकार विवाहीत लोकांना ‘पेन्शन’ देणार, प्रत्येक जोडप्याला मिळणार 72 हजार रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारकडून विवाहित जोडप्यांना खास भेट दिली जाणार आहे. सरकारच्या नवीन योजनेनुसार प्रत्येक जोडप्याला पेन्शनच्या रूपाने 72 हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेला National Pension Scheme for Traders and Self-Employed Persons (NPS-Traders) च्या नावाने सुरु केले गेले आहे. मात्र यासाठी विवाहित जोडप्याला प्रत्येक महिन्याला 200 रुपये जमा करावे लागणार आहेत. त्यानंतरच ते पेन्शन मिळवण्यासाठी पात्र ठरतील.

या योजनेनुसार रजिस्ट्रेशन करण्यासाठी बँकेत सेविग्ज किंवा जनधन खाते आणि आधारकार्ड असणे गरजेचे आहे. रजिस्ट्रेशन साठी अवघे दोन – तीन मिनिट लागतील. तसेच यासाठी दर महिन्याला भरली जाणारी रक्कम देखील निश्चित करण्यात आलेली आहे जि की 55 ते 200 रुपये यादरम्यानची आहे.

जर एखादा व्यक्ती 30 वर्षांचा आहे तर दर महिन्याला त्या व्यक्तीला 100 रूपए भरावे लागणार आहे म्हणजेच वर्षाला 1200 रुपये भरावे लागणार आहेत. याप्रमाणे व्यक्तीला एकूण 36,000 रुपये जमा करावे लागणार आहेत. 60 वर्षांचा झाल्यानंतर त्या व्यक्तीला दर महिन्याला 3000 रुपये प्रतिमहिना मिळेल तसेच यादरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला दर महिन्याला 1500 रुपये मिळतील.

जर पती पत्नी असे दोघीही या योजनेमध्ये पैसे भरायला तयार असतील तर दोघेही या योजनेमध्ये पैसे भरू शकतात. 60 वर्षानंतर दोघांनाही दर महिन्याला प्रत्येकी 6 हजार रुपये म्हणजेच वार्षिक 72 हजार रुपये मिळतील.

ज्यांचा वार्षिक टर्नओव्हर 1.5 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे असे लोक देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये दुकानदार, 18 ते 40 वयोगटातील छोटे मोठे किरकोळ व्यापाऱ्यांचा देखील समावेश आहे

Visit : Policenama.com