फायद्याची गोष्ट ! मोदी सरकारच्या ‘या’ स्कीमव्दारे घर बसल्या मिळतील ‘दरमहा’ 5 हजार रूपये, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही 18 वर्षांचे आहात आणि आतापर्यंत भाविष्याचे कोणतेही प्लॅनिंग झालेले नाही तर ही संधी तुमच्यासाठी अत्यंत खास आहे. कारण भारत सरकारची एक अशी योजना आहे ज्यात अगदी थोडेसे पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला 60 वर्षांच्या वयानंतर दरमहा 5 हजार पेंशन म्हणजेच वर्षाला 60 हजार रुपयांचा लाभ मिळेल.
अटल पेंशन योजना ही योजना कमी कमाई असलेल्या लोकांसाठीची मोदी सरकारची एक पॉप्युलर पेंशन योजना आहे. जी निश्चित परताव्याची हमी देते. या योजनेंतर्गत 18 वर्ष वय झाल्यानंतर देशातील कोणताही नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतो. त्याअंतर्गत एक बँक खाते सुरु करणे आवश्यक आहे ज्यात महिना, तिमाही किंवा सहामाही गुंतवणूकीची सुविधा असेल. योजनेंतर्गत 60 हजार वर्षाला म्हणजेच 5 हजार दरमहा पेंशन देण्यात येईल.
कसे मिळतील 5 हजार रुपये महिना –
जर तुम्ही अटल पेंशन स्कीममध्ये 18 वर्षांचे असताना सहभागी झालात आणि तुम्ही 5 हजार रुपये महिना किंवा 60 हजार वर्षाला पेंशनसाठी खाते सुरु करतात तर तुम्हाला दरमहा 210 रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच वर्षाला सरासरी 2520 रुपये. यानंतर 60 वर्षानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात दरमहा 5 हजार रुपये पेंशन म्हणजे वर्षाला 60 हजार रुपये मिळण्यास सुरुवात होईल.
कमी वयात योजनेत सहभागी होण्याचा फायदा –
जर तिमाही प्लॅनमध्ये 18 व्या वर्षी सहभागी झालात तर तुमची एकूण गुंतवणूक 1.05 लाख रुपये होईल. तर 35 वर्षाच्या वयात योजनेत तिमाही प्लॅन घेतला तर दर तीन महिन्याला 2688 रुपये जमा करावे लागतील. तुम्हाला 25 वर्ष गुंतवणूक करावी लागेल. त्यानुसार तुमची एकूण गुंतवणूक 2.68 लाख रुपये होईल. एकसारख्या पेंशनसाठी तुम्हाला जवळपास 1.63 लाख रुपये अतिरिक्त जमा करावे लागतील. त्यामुळे जेवढ्या कमी वयात योजनेशी जोडले झालं तेवढा अधिक फायदा.
या योजनेचा फायदा –
यात तुमची एकूण गुंतवणूक फक्त 1.05 लाख रुपये होईल तर पूर्ण आयुष्य तुम्हाला 5 हजार दरमहा पेंशन मिळेल.
योजनेचे अन्य लाभ –
– ही योजना राष्ट्रीय पेंशन योजनेच्या माध्यमातून पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणद्वारे संचालित केली जात आहे.
– आयटीच्या सेक्शन 80CCD अंतर्गत टॅक्समध्ये देखील सूट मिळते.
– एका सदस्याच्या नावे फक्त एक खाते सुरु करता येते.
– कोणत्याही बँकेत खाते सुरु करण्याची सुविधा आहे.
– सुरुवातीला 5 वर्ष सरकारकडून देखील योगदान रक्कम जमा केली जाईल.
– ही 1000, 2000, 3000, 4000 किंवा 5000 च्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल.
– जर 60 वर्षांपूर्वी किंवा नंतर सदस्याचा मृत्यू झाला तर पेंशनची रक्कम त्यांच्या पत्नीस दिली जाईल.
– जर सदस्य आणि पत्नी दोघांचा मृत्यू झाला असेल तर सरकार नॉमिनीला पेंशन देईल.
2 प्रकारचे इतर प्लॅन –
1. तिमाही प्लॅन – या अंतर्गत तुम्हाला दर तीन महिन्यांनी 626 रुपये गुंतवणूक करायची आहे. ही गुंतवणूक तुम्हाला 42 वर्षांपर्यंत करायची आहे. या दरम्यान एकूण गुंतवणूक होईल 1.05 लाख रुपये. यानंतर 60 वर्ष वयानंतर सदस्याला आजीवन 5 हजार रुपये महिना पेंशन देण्यात येईल.
2. सहामाही प्लॅन – या अंतर्गत तुम्हाला दर 6 महिन्यांनी 1239 रुपये गुंतवावे लागतील. ही गुंतवणूक 42 वर्षांपर्यंत करायची आहे. या दरम्यान तुमची एकूण गुंतवणूक 1.04 लाख रुपये होईल. यानंतर 60 वर्ष वयानंतर सदस्याला आजीवन दरमहा 5 हजार रुपये पेंशन देण्यात येईल.