नोकरदारांसाठी प्रचंड दिलासादायक ! PF अकाऊंट मधून काढता येणार 75 % रक्कम, पैसे परत देखील करावे नाही लागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या लोकांना दिलासा मिळावा म्हणून पॅकेजची घोषणा केली आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतर्गंत संघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओच्या रेग्युलेशनमध्ये बदल केले आहेत. आता कर्मचारी आपल्या पीएफ खात्यातून 75 टक्के रक्कम किंवा तीन महिन्यांचा पगार, यातील जी कोणती रक्कम कमी असेल ती काढू शकतात. तसेच सरकार पुढील तीन महिन्यांपर्यंत एंप्लॉयर आणि एम्प्लॉय (मालक आणि कर्मचारी) दोघांना ईपीएफ कॉन्ट्रीब्यूशन देईल.

पुढील तीन महिने सरकार भरणार ईपीएफ –
अर्थमंत्री म्हणाल्या, सरकारने कोरोना व्हायरस पसरल्याने तो रोखण्यासाठी 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊनशी लढण्यासाठी आर्थिक प्रोस्ताहन पॅकेजला अंतिम रुप दिले आहे. सरकार एम्प्लॉयी आणि एम्प्लॉयर दोघांद्वारे देण्यात येणाऱ्या ईपीएफओ योगदान पुढील तीन महिन्यापर्यंत भरेल. 100 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कंपनी ज्यात 90 टक्के कर्मचाऱ्यांचे वेतन 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओ खात्यात सरकार स्वत: पुढील तीन महिन्यांपर्यंत पैसे टाकेल. यामुळे 80 लाख मजुरांना आणि 4 लाख संघटीत क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा मिळेल.

पीएफमधून पैसे काढण्याची अट शिथिल –
सरकारने पीएफ रक्कम काढण्याची अट शिथिल करण्याची घोषणा केली आहे. अर्थमंत्री म्हणाल्या, संघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओच्या रेग्युलेशनमध्ये बदल केले आहेत. आता कर्मचारी आपल्या प्रोविडेंट फंड खात्यातून 75 टक्के रक्कम किंवा 3 महिन्यांचा पगार, यात जी काही कमी रक्कम असेल ती काढू शकतात. ते पैसे त्यांना परत करावे लागणार नाहीत. यामुळे 4.8 कोटी लोकांना फायदा होईल.

20 कोटी जनधन खाते असलेल्या महिलांना 500 रुपये प्रति महिना –
याशिवाय, अर्थमंत्र्यांनी महिलांसाठी देखील मोठी घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या, महिला जनधन खात्यात तीन महिन्यांपर्यंत 500 रुपये सरकारद्वारे जमा केले जातील. यामुळे 20.50 कोटी महिलांना थेट फायदा होईल.

You might also like