राज्यांना 16 ते 31 मे दरम्यान 1.92 कोटी व्हॅक्सीन पाठवणार केंद्र सरकार : प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोना व्हॅक्सीनची प्रचंड टंचाई जाणवत आहे. यावर आता केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले की, 16 मेच्या रात्रीपासून 31 मेच्या दरम्यान राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना 1 कोटी 92 लाख व्हॅक्सीनचा पुरवठा केला जाईल. त्यांनी म्हटले की, ही व्हॅक्सीन राज्य सरकारांना मोफत दिली जाईल.

यापूर्वी सरकारने दावा केला की, देशात ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत व्हॅक्सीनचे 216 कोटी डोस उपलब्ध होतील. सोबतच सरकारने आज सरकारी पॅनलच्या त्या शिफारसींना मंजूरी सुद्धा दिली आहे, ज्यामध्ये कोविशील्ड व्हॅक्सीनच्या पहिल्या आणि दुसर्‍या डोसमधील गॅप वाढवण्याचे म्हटले होते. आता 12 ते 16 आठवड्यानंतर दुसरा डोस मिळेल.

केंद्र सरकारनुसार ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत एकुण 216 कोटी व्हॅक्सीन डोस उपलब्ध होण्याची आशा आहे. यापैकी 55 कोटी कोव्हॅक्सीनचे डोस, 75 कोटी कोविशील्डचे डोस, 30 कोटी बायो-ई सब युनिट व्हॅक्सीनचे डोस, 5 कोटी जायडस कॅडिला डीएनएचे डोस, 20 कोटी नो-व्हॅक्सचे डोस, 10 कोटी भारत बायोटेक नेजल व्हॅक्सीनचे डोस, 6 कोटी जिनोव्हाचे डोस आणि 15 कोटी स्पूतनिकचे डोस उपलब्ध होतील.