Modi Govt Withdrawals New Advisory On Aadhaar Card | चौफेर टीकेनंतर बॅकफुटवर मोदी सरकार, मागे घेतली Aadhaar बाबत जारी नवी अ‍ॅडव्हायझरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Govt Withdrawals New Advisory On Aadhaar Card | आधार कार्डशी संबंधित नवीन अ‍ॅडव्हायझरीबाबत सर्वत्र विरोध झाल्यानंतर मोदी सरकारने ती तात्काळ मागे घेतली आहे. सोबतच, यास एक सामान्य कार्यवाही म्हटले आहे. (Modi Govt Withdrawals New Advisory On Aadhaar Card)

 

आयटी मंत्रालयाने मागे घेतली अ‍ॅडव्हायझरी
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) चा नवीनतम अ‍ॅडव्हायझरी तात्काळ प्रभावाने मागे घेण्यात आली आहे. त्याबाबत गैरसमज होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. युआयडीएआयने आधार क्रमांक शेअर करण्याच्या सामान्य प्रक्रियेबद्दल सल्ला देण्यासाठी ही प्रेस रिलीज जारी केली होती. ही एक सामान्य क्रिया आहे.

 

आधार पूर्णपणे सुरक्षित
यासह, सरकारने सामान्य लोकांना पुन्हा आश्वासन दिले की आधार ओळखण्याची इकोसिस्टम सुरक्षित आहे. कार्डधारकाची ओळख आणि गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी पुरेशी सुरक्षा वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत. (Modi Govt Withdrawals New Advisory On Aadhaar Card)

आधारबाबत काय म्हणाले UIDAI?
युआयडीएआयच्या बंगळुरू प्रादेशिक कार्यालयाने अलीकडेच एक नवीन आधार अ‍ॅडव्हायझरी जारी केली होती. यामध्ये लोकांनी आधार कार्डची छायाप्रत कोणत्याही संस्थेला देऊ नये, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो, असे सांगण्यात आले होते. त्याऐवजी तुम्ही मास्क्ड केलेले आधार वापरू शकता.

 

तुमचा पूर्ण 12 अंकी आधार क्रमांक मास्क्ड (What is Masked Aadhaar?) आधारमध्ये दिसत नाही. त्याऐवजी आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे चार अंक त्यात दिसतात. आपण ते ऑनलाइन देखील मिळवू शकता.

 

यासोबतच लोकांना असेही सांगण्यात आले की, परवाना नसलेल्या खाजगी संस्था त्यांचे आधार गोळा करू शकत नाहीत किंवा ते त्यांच्याकडे ठेवू शकत नाहीत. यामध्ये विनापरवाना हॉटेल्स आणि सिनेमा हॉलचा समावेश आहे. अशावेळी, कार्ड धारकांनी आधार तपशील फक्त अशा संस्थांशी शेअर केला पाहिजे ज्यांच्याकडे युआयडीएआयकडून घेतलेले यूजर लायसन्स आहे.

 

चौफेर टीकेने सरकारला घेरले
युआयडीएआयच्या या अ‍ॅडव्हायझरीबाबत सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली.
सोशल मीडियावर असे म्हटले जात होते की सरकारने ही अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यास उशीर केला,
कारण लोक जवळपास 10 वर्षांपासून आधार कार्ड वापरत आहेत.

 

त्याच वेळी, सर्वत्र अनिवार्य केल्याबद्दल आणि नंतर त्याची फोटो कॉपी शेअर न करण्याबाबत जारी करण्यात
आलेल्या या अ‍ॅडव्हायझरीवर अनेकांनी टीका केली.
याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मीम्सही शेअर होऊ लागले आहेत.

ओवेसी यांनी सरकारला घेरले
AIMIM चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही आधार कार्डबाबत सरकारच्या अ‍ॅडव्हायझरीवर टीका केली.
ते म्हणाले की, सरकारी संस्था अनेक वर्षांपासून आधार अनिवार्य करण्यात व्यस्त आहेत.
आताा त्यांना अपेक्षा आहे की, सामान्य लोकांनी नव्या अधिसूचनेवर चर्चा करावी, अन्यथा आपले नुकसान सहन करावे.

 

सरकारच्या धोरणांवर टीका करताना ओवेसी म्हणाले की, हे विसरू नये की,
आधारचा वापर जमावाद्वारे लोकांना त्रास देण्यासाठी आणि मारण्यासाठी करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशच्या देवासमध्ये आधार कार्ड नसल्यामुळे एका मुस्लिम विक्रेत्याला मारहाण करण्यात आली होती.

 

Web Title :- Modi Govt Withdrawals New Advisory On Aadhaar Card | modi govt withdrawals new advisory on aadhaar card with immediate effect after criticism

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena Shivsampark Abhiyan | महाविकास आघाडीत राष्ट्रवादी करतेय कुरघोडी, शिवसेनेच्या 2 खासदारांची नाराजी

 

Pune Pimpri Crime |  लग्नाचे आमिष दाखवून 40 वर्षीय महिलेवर बलात्कार 

 

Pune Pimpri Crime | शेतकऱ्याची वडिलोपार्जित जमीन हडपण्याचा प्रयत्न, 4 जणांवर गुन्हा दाखल