पंतप्रधान मोदींचे नाव घेऊन भाजप आमदाराची मतदारांना ‘ही’ धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केंद्रावर कॅमेरे लावले आहेत. तुम्ही भाजपला सोडून काँग्रेस उमेदवाराला मत दिले तर तुम्हाला काम मिळणे बंद होईल. अशी धमकी देणारे वक्तव्य भाजप आमदार रमेश कटारा यांनी केले आहे.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान भाजप आमदार रमेश कटारा यांनी गुजरातमधील दाहोद येथील भाजपचे उमेदवार जसवंत भाभोर यांचा ईव्हीएम मशीनमध्ये फोटो असेल. त्याच्यासमोरच कमळ चिन्हाचे बटन असेल ते बघताच दाबावे. कोणतीही चुक झाली नाही पाहिजे. कारण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केंद्रावर कॅमेरे लावले आहेत. तुम्ही भाजपला सोडून काँग्रेस उमेदवाराला मत दिले तर तात्काळ कॅमेरॅत दिसेल. मोदीसाहेबांनी आता तर आधार कार्ड, रेशन कार्डवर फोटो लावले आहेत. त्यावरून तुमची ओळख होईल. तुमच्या मतदान केंद्रामध्ये कमी मते मिळाली तर कोणी मत दिले नाही याची ओळख होईल आणि तुम्हाला काम मिळणे बंद होईल. असे धमकीचे वक्तव्य भाजप आमदार रमेश कटारा यांनी केले आहे.

विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या वक्तव्यावर कडक कारवाई केली असूनही नेते वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. आणि यातच भाजप आमदाराचे मतदानासाठी मतदारांना धमकावणे. यावर आता निवडणूक आयोग काय कारवाई करेल याकडे विरोधी पक्षांचे लक्ष लागले आहे.

You might also like