home page top 1

PM मोदींनी मन जिंकलं ! ह्यूस्टनच्या विमानतळावर घडलं साधेपणाचं दर्शन, व्हिडिओ व्हायरल

ह्यूस्टन : वृत्‍तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौर्‍यावर आहेत. त्यांच्या साधेपणाचं दर्शन ह्यूस्टनच्या विमानतळावर घडलं. मोदींचं विमानतळवर स्वागत करण्यात आलं. त्यावेळी एका महिला अधिकार्‍यांनं त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. दरम्यान, जमिनीवर फूल पडल्याचं मोदींच्या लक्षात आलं आणि त्यांनी तात्काळ ते फुल स्वतः उचललं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

मोदींची उर्जा क्षेत्रातील महत्वाच्या मुख्याधिकार्‍यांसोबत बैठक झाली. मोदींकडून मोठया घोषणेच्या अपेक्षा आहेत. हाउडी मोदी कार्यक्रमात मोदी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. विमानतळावर घडलेल्या प्रसंगानंतर सोशल मीडियावर सर्वत्र मोदींचा व्हिडिओ व्हायरल होते आहे. त्यातच पंतप्रधान असावेत तर मोदींसारखे अशी टिप्पणी देखील एका यूजरनं पोस्टमधून केली आहे.

Visit :- policenama.com

Loading...
You might also like