पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपिता ; ‘या’ नेत्याचे विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘मोदी आमचे वडील आहेत , फक्त आमचेच नाही तर ते राष्ट्रपिता आहेत ‘ असे विधान अण्णाद्रमुकचे मंत्री के टी. आर. बालाजी यांनी केले आहे. अम्मा (जयललिता ) यांच्या मृत्यूनंतर मोदींनीच अण्णाद्रमुक पक्षाला आपल्या पुत्राप्रमाणे जपले आहे . असेही बालाजी यांनी बैठकीदरम्यान म्हंटले आहे. विरुथुनगर मधील पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते . याबाबतची माहिती ट्विट करून एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

या बैठकीदरम्यान बालाजी म्हणाले की, “मोदी आमचे वडिल आहेत. जेव्हा आम्ही आमच्या अम्माला गमावले , तेव्हा मोदींनी आम्हाला मार्गदर्शन केले . आणि आश्रय दिला.” मोदी फक्त अण्णाद्रमुकचे वडिल नाहीत, ते राष्ट्रपिता अहेत. म्हणून अण्णाद्रमुकने भाजपशी युती केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/ANI/status/1104309284953825280
नुकतंच पियुष गोयल यांनी चेन्नईमध्ये अण्णाद्रमुकच्या नेत्यांची भेट घेतली होती. भेटीनंतर गोयल यांनी भाजप आणि अण्णा द्रमुकच्या निवडणूकपूर्व युतीची घोषणा केली होती. तसेच लोकसभेचे जागावाटपही त्यांनी जाहीर केले होते.