‘मोदी सगळ्यात वाईट पंतप्रधान’ 

दिल्ली : वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी हे भारताला आजवर लाभलेले सर्वात वाईट पंतप्रधान आहेत, अशी टीका पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केली. गेल्या पाच वर्षांत त्यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी पूर्ण करण्यात आलेले एक आश्वासन सांगावे. त्यांनी केवळ जुमलेबाजी करून लोकांना फसवले. यामुळे देशाची पत खालावली. ही गोष्ट लोकांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे आता जनतेने त्यांना सत्तेवरून हटवण्याची तयारी सुरु केल्याचे अमरिंदर सिंग यांनी सांगितले.

‘गरिबी हटाव’ नंतर कर्जमाफी हा काँग्रेसचा नवा जुमला – मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच गुरुदासपूर येथे झालेल्या सभेत कर्जमाफी, शीखविरोधी दंगल आणि इतर मुद्द्यांवरुन काँग्रेसला लक्ष्य केले होते. देशातील इतर राज्यांप्रमाणे काँग्रेसने पंजाबमध्येही कर्जमाफीची घोषणा केली होती. पण दीड वर्षांनी काय परिस्थिती आहे सर्वांनाच माहिती आहे. काँग्रेसच्या काळात शेतकरी नसलेल्यांची कर्जे माफ करण्यात आली. काँग्रेसने अनेक वर्षे ‘गरिबी हटाव’चा नारा देऊन देशातील जनतेची फसवणूक केली. यानंतर आता कर्जमाफी हा काँग्रेसचा नवा जुमला असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता पर्यंत त्यांना आलेल्या अपयशाला अनुसरून नवीन वर्षात त्यांची मुलाखत घेण्यात आली.

देशात आता १६ मे नंतर तुमचे सरकार येणे अटळ दिसते. तशा स्वरूपाची भावना अनेक जण व्यक्त करू लागले आहेत. तर अशा वेळी ‘पंतप्रधान मोदी’ या नात्याने कोणत्या पाच मुद्दय़ांना हात घालणे प्राधान्यक्रमाने तुम्हाला महत्वाचे वाटते ?

– जनतेच्या इच्छेनुसार आम्हाला सरकार बनवण्याची खरोखरच संधी मिळाली, तर माझ्या दृष्टीने अत्याधिक महत्वाचा मुद्दा असेल तो जनतेचा सरकारवरून उडालेला विश्वास पुन्हा कसा प्रस्थापित होईल हा. जनतेचा सरकारवरून विश्वास उडणे हे माझ्या दृष्टीने अत्यंत धोकादायक. तो विश्वास पुन्हा प्रस्थापित करणे हे माझे पहिले कर्तव्य असेल. ते काम हाती घेण्यात मी जराही वेळ दवडू इच्छित नाही.

उद्योगमित्र अशी तुमची एक प्रतिमा तयार झाली आहे. तेव्हा तुमच्या दृष्टीने मनमोहन सिंग सरकारने घेतलेले कोणते निर्णय तुम्हाला उद्योगविरोधी वाटतात? त्यात तुमच्याकडून काय बदल होतील?

– माझ्या मते मनमोहन सिंग सरकारने कोणते वाईट निर्णय घेतले हा अजिबात काळजीचा विषय नाही. तर त्या सरकारने मुळात निर्णयच घेतले नाहीत हे माझ्या मते अधिक दखलपात्र आहे. हे वास्तव असल्यामुळे त्यांनी कोणते निर्णय चुकीचे घेतले आणि मी कोणते बदलेन हा विषय नाही. कोणत्याही प्रश्नावर निर्णय घ्यायचेच नाहीत हा त्या सरकारचा निर्णय होता. त्यात त्यांनी जे काही निर्णय घेतले ते वेळ टळून गेल्यावर. त्यामुळे तेही निरूपयोगी ठरले. विलंब आणि विशेषाधिकार हे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारचे व्यवच्छेदक लक्षण बनून गेले आहे.

तुमच्या हिंदुत्ववादी भूमिकेचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर काय परिणाम होईल ?

– वसुधैव कुटुंबकम हा विचार हिंदुच आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे परस्पर आदर आणि सहकार्य हाच आमच्या परराष्ट्र धोरणाचा गाभा असेल. तेव्हा माझ्या मते माझ्या हिंदुत्ववादी चेहेऱ्याचा झाला तर परराष्ट्र धोरणावर चांगलाच परिणाम होईल, यात मला जराही शंका नाही.

 अमेरिकेचा खासकरून तुमच्यावर विशेष राग दिसतो. तुम्ही सत्तेवर आलात तर त्या देशाच्या भारताबाबतच्या दृष्टीकोनात बदल होईल का? तो होणार असेल तर काय होईल आणि होणार नसेल तर तुमचा अमेरिकेकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय असेल ?

– या संदर्भात माझी भूमिका स्वच्छ आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या रालोआ सरकारने तयार करून दिलेल्या मार्गानेच जाणे. कोणाही देशाबरोबरच्या आपल्या संबंधांसाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने तयार करून दिलेल्या नीतीतत्वांच्या आधारेच आम्ही मार्गक्रमणा करू. हाच नियम अमेरिकेबाबतही पाळला जाईल. एक व्यक्ती वा त्या व्यक्तीबाबतची एखादी घटना यामुळे त्या त्या देशाबाबतच्या संबंधांवर परिणाम होत नाही. व्यक्तीपेक्षा देश आणि देशाचे हितसंबंध हा मुद्दा नेहमीच मोठा असतो.

तुम्ही एकांगी, हुकुमशाही वृत्तीचे आहात, असा एक आरोप तुमच्यावर सतत होत असतो. त्यात कितपत तथ्य आहे? त्यात तुमच्या मते तथ्य नसेल तर हा आरोप वारंवार का होतो? आणि तथ्य असेल तर तसे आरोप होऊ नयेत म्हणून तुम्ही काय प्रयत्न कराल ?

– गेली दहा वर्षे केंद्रात काँग्रेसचं सरकार आहे. मला एका विशिष्ट रंगात रंगवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला जात आहे. त्यात प्रचाराचा मोठा भाग होता आणि आहे. परंतु आता प्रसारमाध्यमे आणि एकूणच जनतेला या प्रचारामागचं सत्य कळू लागलेलं आहे. त्या मागचा काँग्रेसचा हातही आता सर्वाना दिसून आलेला आहे. वस्तुत माझी कार्यशैली सांघिक आहे आणि कोणत्याही विषयाशी संबंधितांत जास्तीत जास्त मुद्यांवर सहमती कशी होईल असाच माझा प्रयत्न असतो. तरीही अजूनही माझ्या विषयीच्या केवळ प्रचारावरच ज्यांना विश्वास ठेवायचा आहे, त्यांच्यासाठी माझं एकच सांगणं आहे. ते म्हणजे मी कसा आहे ते माझ्या कामातून आणि निर्णय प्रक्रियेतून पाहा आणि मग ठरवा.

सध्याच्या निवडणुकीने विविध पक्षांत एक प्रकारची शत्रुत्वाची भावना तयार झालेली आहे. सर्व पक्षांनीच जरा शांत व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं का? भडकभावनेनं झालेल्या जखमांवर फुंकर घालण्याची गरज तुम्हाला वाटते का ?

– माझा आणि माझ्या पक्षाचा तरी निदान प्रयत्न आहे तो मुख्य मुद्दे, धोरणं या भोवतीच प्रचार फिरता ठेवण्याचा. लोकांना याच प्रश्नांत जास्त रस आहे. परंतु माझ्या विरोधकांबद्दल मात्र हे म्हणता येईल अशी परिस्थिती नाही. सत्तात्याग करावा लागेल या भीतीनं एक प्रकारचं नैराश्य त्यांना आलं असून त्यांनी प्रचार व्यक्तीकेंद्रीत केला आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांची भाषा तर आक्षेपार्ह म्हणावी अशी आहे. परंतु त्यातही खिन्न करणारी बाब त्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्याकडे कानाडोळा करणं. यामुळे एका अर्थानं बेजबाबदार आरोप-प्रत्यारोपांना उत्तेजनच मिळतं.

तुमचे काही विशिष्ट उद्योगपतींशी, विशेषत अदानी समुहाशी अतिजवळकीचे संबंध आहेत, असा आरोप आम आदमी पक्षाकडून सातत्यानं होतोय. तुमची त्या बाबतची प्रतिक्रिया..

– बिनबुडाच्या प्रत्येक आणि प्रत्येकाच्या आरोपांना उत्तर देत बसणं मला शक्य नाही. ते मला आवश्यकही वाटत नाही. गेला जवळपास महिनाभर मी पायाला भिंगरी लावल्यासारखा देशभर फिरतोय. ती जबाबदारी मला जास्त महत्वाची वाटते. त्यामुळे माझ्या पक्षातल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी या आरोपांना उत्तर दिलंय. माझ्या मते ते पुरेसं आहे. त्या पलिकडे जाऊन असल्या आरोपांचा प्रतिवाद करणं मला अनावश्यक वाटतं. माझ्या मते सत्य परिस्थिती सर्वासमोर आलेली आहे.