भाजपाचे मिशन बंगाल ‘फत्ते’, २ वरून १८ जागांवर मुसंडी

कोलकत्ता : वृत्तसंस्था – २०१४ च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या लाटेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपला गड राखता आला नाही. असे असले तरी ३४ जगा तृणमूलने जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजापाला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र मागील पाच वर्षात ज्या पद्धतीने भाजपाने बंगालच्या जमीनीवर कमळ फुलवण्यासाठी मेहनत घेतली. त्याचा परिणाम २०१९ च्या निवडणुकीत दिसून आला. या निवडणुकीत भाजपाला १८ जागा मिळाल्या. विरोधी पक्ष काँग्रेसला दोन जागा मिळाल्या तर माकपचा सुफडासाफ झाला.

बंगालमध्ये अनेक वर्ष सत्तेवर असलेल्या डाव्यांची मक्तेदारी ममता बॅनर्जी यांनी २०११ साली संपुष्टात आणली होती. मागील एका दशकापासून विजयी राहिलेल्या ममतांना या निवडणुकीत मोदींच्या त्सुनामी समोर हार पत्करावी लागली. २०११ नंतर बंगालमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ममता बॅनर्जींची जादू लोकांवर चालली. मात्र, या निवडणुकीत ममतांची जादू दिसून आली नाही. बंगालमध्ये भाजपाला जो विश्वास होता तो विश्वास या ठिकाणच्या लोकांनी मतामधून दाखवून दिला.

मोदींनी काढलेल्या रॅली लक्षवेधी ठरल्या होत्या. उत्तर प्रदेशनंतर मोदींची १७ वी रॅली बंगालमध्ये झाली. ममता बॅनर्जींना भाजपासाठी एक इंच जागा देण्यासाठी देखील तयार नव्हत्या. त्यासाठी त्यांनी बंगालमधील ४२ जागांसाठी तब्बल १५० रॅली काढून १५० किलोमीटरची पदयात्रा काढली. त्याचबरोबर ममतांनी मोदी आणि शहा यांच्यावर व्यक्तीगत टीका केली. मात्र, बंगालच्या जनतेवर ममतांच्या बोलण्याचा काही प्रभाव पडल्याचे दिसून आले नाही. त्यांनी ममतांच्या विरोधात भाजपाला मतदान केले. एवढेच नाही तर राज्यात भाजपा दुस-या क्रमांकाचा पक्ष बनला. यामुळे २०२१ मध्ये बंगालमध्ये होणारी विधानसभेची निवडणूक ममता बॅनर्जींसाठी सोपी राहीलेली नाही.

सहाव्या टप्प्यातील मतदानापूर्वी ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्रीराम’ चा नारा देत प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र या प्रतिक्रियेला बंगालच्या जनतेने जास्त गांभीर्याने घेतले नाही. एवढेच नाही तर संपूर्ण देशात मतदानाच्या दरम्यान हिंसाचार झाला. यामुळे लोकांमध्ये नराजी पसरली होती, कारण बंगालमध्ये हिसाचार न होता निवडणुका का होत नाहीत असा प्रश्न बंगालच्या लोकांना पडला. त्यातच एनआरसी आणि नागरीकत्व अधिनीयमाला केलेला विरोध ममतांच्या अंगलट आला. कारण दार्जिलींग आणि आसनसोल जागा सोडल्यातर ज्या जागांवर भाजपाने ज्या जागांवर विजय मिळवला त्या जागा पूर्वी तृणमूल काँग्रेसच्या ताब्यात होत्या.

बंगालमध्ये मतुआ सांप्रदाय जास्त आहे. मतुआ वोट बँकेचे महत्व ओळखून मोदींनी बनगाव येथील ठाकूरनगर गाठले. या ठिकाणी निवडणुका जाहीर होण्याआधीच मोदींनी या ठिकाणी सभा घेतली. मतुआ सांप्रदायाच्या वीणापाणि देवी (मोठी आई) ज्यांचे नुकतेच निधन झाले त्यांची मोदींनी भेट घेऊन आशिर्वाद घेत मतांची मागणी केली होती. याचा परिणाम असा झाला की राणाघाट व बनगांव या जागा तृणमूल काँग्रेसच्या हातून निसटल्या आणि या ठिकाणी भाजपाचे कमळ फुलले.