G-20 परिषद : डोनाल्ड ट्रम्प आणि PM मोदींच्या भेटीत झाली ‘या’ ५ महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जपानच्या ओसाकामध्ये सुरू असलेल्या जी-20 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी ट्रम्प यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल मोदींचं अभिनंदन केलं. त्यानंतर या बैठकीत एच वन बी व्हिसा, इराणवरील निर्बंधांमुळे भारताची इंधन अडचण, दोन्ही देशांनी लादलेले वाढीव शुल्क आदी मुद्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा होती. मात्र झाले उलटेच.

या बैठकीत ट्रम्प यांनी सुरुवातीला लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी आभार मानले. त्यानंतर या दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईरान, ५ जी, द्विपक्षीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर चर्चा करण्याची विनंती केली मात्र अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या खालील पाच प्रमुख विषयवार चर्चा केली.

१) सर्वात पहिले डोनाल्ड ट्रम्प यांनी लोकसभेतील विजयाबद्दल नरेंद्र मोदींचे आभार मानले. मोदींना शुभेच्छा देताना ते म्हणाले कि, तुम्ही उत्तम काम केले आहे. ट्रम्प याच्या या अनपेक्षित कृतीचे सर्वांनाच आश्चर्य वाटले.

२) त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा निवडणूक जिंकलात, तेव्हा अनेक गट आपापसात लढत होते. मात्र आता ते एकत्र आले आहेत. यातून तुमची अद्भुत क्षमता दिसते,’ अशा शब्दांमध्ये ट्रम्प यांनी मोदींचं कौतुक केलं.

३) त्यानंतर ट्रम्प यांनी मोदींचे कौतुक करताना म्हटले कि, भारतातील सर्व गट त्यांनी एक करत भारताच्या विकासात हातभार लावला आहे. प्राचीन काळापासून भारतात असलेली हि प्रथा मोदींनी नष्ट करून देशाच्या विकासात मोठी भूमिका बजावली आहे.

४) लोकशाही आणि शांततेसाठी कटिबद्ध असल्याचं मोदी म्हणाले. ‘सबका साथ, सबका विकास हा आमचा मंत्र आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून आम्ही पुढे जात आहोत,’ असं मोदींनी ट्रम्प यांना सांगितलं.

५) त्यानंतर भारत आणि अमेरिकेच्या संबंधावर बोलताना ट्रम्प म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि अमेरिकेचे संबंध सुधारले आहेत . भारत आणि अमेरिकेची मैत्री नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून मोदी माझे चांगले मित्र असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं.

दरम्यान, या भेटि अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटमुळे या भेटीबाबतीत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र या बैठकीने सर्व विरोधी देशांना झटका बसला आहे.

https://twitter.com/ANI/status/1144413376862412801

आरोग्यविषयक वृत्त – 

दम्याच्या रुग्णांनी घ्यावी ‘ही’ काळजी, अन्यथा वाढू शकतो त्रास

लाल फळे आरोग्याला फायदेशीर, नियमित करा सेवन

ताकाच्या नियमित सेवनाने वाढते रोगप्रतिकारक शक्ति

डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे