Modi New Cabinet । अमित शाहांकडे आणखी एका नव्या खात्याच्या जबाबदारीमुळे राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi New Cabinet । कालच केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्रिमंडळाचा नवीन विस्तार (Modi New Cabinet) करण्यात आला. अनेक मंत्र्यांची उच्च पदी वर्णी लागली तर काही मंत्र्याकडे अतिरिक्त पदाचा भार देखील देण्यात आला. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे आता आणखी एक पदभार देण्यात आला आहे. शाह यांच्याकडे सहकार मंत्रीपद (‘Ministry of Co-operation)’ देण्यात आले आहे. यामुळे आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या काळात राज्यात सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. तर दुसरीकडे अमित शाह (Amit Shah) यांना सहकार खातं दिल्याने महाराष्ट्रातील सहकार चळवळीत मक्तेदारी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अडचणी वाढणार असल्यानं राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आलं आहे.

Jammu And Kashmir । जम्मू कश्मीरमध्ये अवघ्या 24 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा; ‘हिजबुल’च्या टॉपच्या कमांडरलाही कंठस्नान

काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीय संबधीत असणाऱ्या साखर कारखान्यांवर सक्तवसुली संचालनालयाने (ED) छापा टाकला. आणि कारखान्यावर कारवाई करण्यात आली. तर यांनतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अमित शाह यांना याबाबत पत्राद्वारे म्हटलं होत की, इतर असणाऱ्या 30 कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. आता तर सहकार खातचं शाह यांच्या हातात असल्याने आता राष्ट्रवादीला आधीसारखी मुभा मिळणार नाही हे नक्कीच. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आगामी काळात भाजप आणि राष्ट्रवादी या दोघा पक्षाचे संबंध कसे असतील यावर सर्व कारभार असणार आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीने काही भाजपाला ( BJP) विरोध केल्यास साहजिकच केंद्रातील सहकार खात्याद्वारे राष्ट्रवादीच्या असणाऱ्या कारखान्यांवर चौकशीच्या फेऱ्या लागू शकतात. या खात्यातून महाराष्ट्रात भाजपची सत्ता नसताना देखील वर्चस्व गाजवू शकतो असा भाजपचा विचार असण्याची शक्यता आहे.

Maharashtra political News | मुंबई, कोकणमध्ये वर्चस्व असलेल्या शिवसेनेला शह देण्याची भाजपची रणनीती

Modi New Cabinet | amit shah to head new ministry of cooperation ncp may find this difficult

या दरम्यान, देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Government) सहकार मंत्रालय’ (‘Ministry of Co-operation)’ स्थापन करण्यात आले आहे. यानुसार स्वतंत्र प्रशासन, कायदेशीर आणि धोरणात्मक आराखडा तयार करण्याचे काम या मंत्रालयाकडून करण्यात येणार आहे. तसेच, सहकार मंत्रालयामुळे देशातील सहकार चळवळीला बळ मिळेल. या मंत्रालयाद्वारे प्रशासकीय, कायद्यांचा आणि धोरणात्मक कार्यप्रणाली उपलब्ध करून दिली जाईल. तर सहकारी संस्थांना स्थानिक पातळीवर मदत करण्यासाठी कामी येईल. या माध्यमातून सहकारी संस्थांबाबत नागरिकांमधील विश्वास वाढून त्यांचं नातं अधिक घट्ट होऊ शकणार असल्याचं मत केंद्र सरकारने व्यक्त केलं आहे.

मिनिस्ट्री ऑफ को-ऑपरेशन’ अर्थात ‘सहकार मंत्रालयाचं काम काय?

भारतात सहकारावर आधारित आर्थिक विकासाची एक यंत्रणा काम करते. या यंत्रणेमधील प्रत्येक
सदस्य जबाबदारीने काम करतो का यावर देखरेख या खात्याच्या माध्यमातून केली जाणार आहे.
तसेच या मंत्रालयाकडून सहकारी संस्थांना व्यवसाय सुलभता (Ease of doing business) ची
प्रक्रिया सोपी करणे, मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्हच्या (SSCS) विकासासाठी काम करणे असं या
मंत्रालयाच्या कामाकाजाचं स्वरुप असल्याची माहिती मंत्रीपद मिळवण्याआधीच अमित शाह (Amit
Shah) यांनीही ट्विट करून दिली होती. ‘मोदी सरकारने सहकार समृद्धीचं स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Modi New Cabinet | amit shah to head new ministry of cooperation ncp may find this difficult

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update