मोदींच्या रूपाने भारताला ‘अ‍ॅडमॅन’ लाभला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपच्या जाहिरातबाजीवर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. कामं हावो न होवोत भाजपची जाहिरात मात्र प्रथम तयारच असते. मोदींच्या रूपाने भारताला पंतप्रधान नाही तर ‘अ‍ॅडमॅन’ लाभला आहे , अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

साडेचार वर्षांत वाढलेल्या कर्जाचा हिशोब मोदींना द्यावा-

आजकाल वृत्तपत्रांत भाजपच्या पाने भरभरून जाहिराती यायला लागल्या आहेत. एका वृत्तपत्रात दोन दोन – तीन तीन जाहिराती दिल्या जात आहेत, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याचे निदर्शनास आणून देताना जयंत पाटील म्हणाले की , ‘या देशात भाजपा कामापेक्षा जाहिरातीवर जास्त खर्च करते आहे. परदेशी वार्‍यांवर खर्च जास्त झाला आहे. कामांपेक्षा जास्त गाजावाजा करण्यात आला आहे. त्यामुळे साडेचार वर्षांत वाढलेल्या कर्जाचा हिशोब मोदींना द्यावाच लागेल. ‘

मोदींच्या कृपेने देशाची अर्थव्यवस्था संकटात-

देशावरील वाढलेल्या कर्जाबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की , ‘मोदी साहेबांच्या कृपेने देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे.
नोटबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत काही प्रश्न निर्माण झाले आहेत. देशावर ८४ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर मोदी सरकारने केला आहे आणि देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या डोक्यावर ६५ हजारांचे कर्ज करून ठेवण्यात आले आहे. हे जे ३०-४० लाख कोटींचे कर्ज साडेचार वर्षांत वाढले, तो पैसा गेला कुठे असा सवालही पाटील यांनी केला. ३० लाख कोटी रुपये उभे केले ते कशावर खर्च केले? देशावर कर्जाचा डोंगर उभा केलात, तर त्यातून संरक्षणावर किती, देशातील रस्त्यांवर किती खर्च केले याचा हिशोब मात्र मोदी सरकार देणार नाही.’

ह्याहि बातम्या वाचा –

मी कोणत्याही तरुणाला आमदार बनवू शकतो …!

kareena aunty : त्यानं ‘आंटी’ म्हटल्यानं करिना संतापली

“तुम्ही बिनडोक आहात का ?, तुमच्याच नेत्याचे वाटोळं करू नका”

मंत्री महाजन नगरला दाखल ; भाजप उमेदवारी वर खलबतं

” चोराने राफेलची कागदपत्रं परत आणून दिली वाटतं ”