नरेंद्र मोदींच्या शपथवीधीचा मुहूर्त ठरला ; ‘या’ दिवशी होणार शपथवीधी

नवी दिल्ली : यंदा लोकसभेचे निकाल विरोधकांना धक्का देणारे ठरले. अनेकांना अनपेक्षित धक्के मिळाले तर अनेक अनपेक्षितपणे विजयी झाले. त्यात एकमेव भाजपने ३०३ जागांवर विजय मिळवला. तर मित्रपक्षांच्या जागामिळून एकूण ३५२ जागा युतीच्या आहेत. हा विजय मोदी सरकरासाठी अत्यंत आनंदाचा आहे.

लोकसभेतील दणदणीत विजयानंतर पंतप्रधानपदी पुन्हा एकदा मोदींच्याच नावाची वर्णी लागली आहे. त्यांच्या शपथविधीची तारिख, वेळ आणि ठिकाण ठरले आहे. ३० मे रोजी राष्ट्रपतीभवनात सायंकाळी ७ वाजता हा शपथवीधी सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे मोदीभक्तांमध्ये पुन्हा एकदा आनंदाची तयारी करत आहेत.

दरम्यान, मोदींच्या या शपथविधी सोहळ्याला कोणकोणते नेते हजर असणार तसंच या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला निमंत्रण असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे त्याचीही उत्सुकता लोकांना लागली आहे. तसंच मोदी या सोहळ्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय राजकिय मंडळींना आमंत्रण देणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

देशातून भाजपला अनेकदा प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले. त्यानंतरही भाजपला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. भाजपवर मात करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत माहाआघाडी बनवली. मात्र तिही भाजपसमोर फिकी पडली.