‘हा’ आहे लोकसभा निवडणुकीतील गल्लीबॉय : फिरसे मोदी आयेगा, खाया ना खायेगा देश को बचायेगा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्व पक्ष व्यस्त असतानाच सोशल मीडियावर एका चिमुरड्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हा चिमुरडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक रॅप साँग गाताना दिसत आहे. त्याच्या हा व्हिडीओ बॉलीवूडकरांना देखील आवडला आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत ‘हा’ गली बॉय चांगलाच फेमस झाला आहे.

अशोक पंडित यांनी हा व्हिडीओ शेअर करताना जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे. जया बच्चन यांनी सपाच्या उमेदवार पूनम सिन्हा यांचा लखनौमध्ये प्रचार केला. प्रचारादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंडीत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहले आहे, ‘देशाच्या भविष्याकडून जया बच्चन यांना उत्तर देण्यात आले आहे. माझी अशी इच्छा आहे की त्यांनी हा व्हिडीओ पाहावा आणि मोदींची व देशाची माफी मागावी.’

सोशल मीडीयावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओचे बोल असे आहेत, ‘फिरसे मोदी आयेगा, खाया ना खायेगा देश को बचायेगा’. गल्ली बॉय चित्रपटाच्या स्टाईलमध्ये या मुलाने हे रॅप साँग म्हटले असून यात मोदींनी घेतलेल्या अनेक निर्णयांचे आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.


https://twitter.com/squintneon/status/1123110492279455744