खुशखबर ! इनकम ‘टॅक्स’मध्ये होणार ‘कपात’, अर्थमंत्र्यांनी दिले संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इनकम टॅक्स स्लॅबममध्ये लवकरच बदल करण्याचे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले. या मागचा विचार असा आहे की लोकांची क्रयशक्ती वाढेल आणि बाजारातील वस्तूंची मागणी वाढेल. त्यामुळे पुरवठा देखील त्या प्रमाणात वाढेल. खासगी क्षेत्रातील कमी गुंतवणूक आणि मागणीमधील घट याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतोय. यासाठीच एक उपाय म्हणून इनकम टॅक्समध्ये कपात करण्याचा सरकारचा विचार आहे.

अर्थसंकल्पापर्यंत पाहावी लागेल वाट
एका कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, सरकार अनेक उपायांवर विचार करत आहे. इनकम टॅक्समध्ये कपात करणे हा त्यातीलच एक मार्ग आहे. पण यासाठी अर्थसंकल्पापर्यंत वाट पाहावी लागेल. 2020-2021 या आर्थिक वर्षासाठी फेब्रुवारी 2020 मध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात येईल.

विकासदर 4.5 टक्क्यांवर
देशाचा आर्थिक विकासदर 4.4 टक्के झाला आहे. मागील काही महिन्यातील हा निचांकीचा दर आहे. याशिवाय 8 प्रमुख क्षेत्रात उत्पादन कमी झाले आहे. यात वीजपुरवठा, कोळसा, पोलाद या उद्योगाचा देखील समावेश आहे. सध्या रिअल इस्टेट क्षेत्र आणि ऑटो सेक्टर संकटात आहे.

मागील 4 महिन्यात सरकारने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काही पावले उचलली आहेत. गेल्या सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने कॉर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या महसूलावर यामुळे 1.45 लाखाचा बोजा पडणार आहे. आरबीआयने देखील मागील बैठकीत व्याजदरात कपात न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महागाईच्या काळात इनकम टॅक्समध्ये कपात होणार असेल तर तो सामान्यांसाठी मोठा दिलासा असेल.

Visit : Policenama.com

Advt.