#Video : बंगालमध्ये रोडशोच्या आधी मोदी-शहा यांचे पोस्टर हटविले, ‘ही’ तर लोकशाहीची हत्या, भाजपचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोलकत्यामध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅली आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे पोस्टर हटविण्यात आले आहे. पोस्टर काढून टाकत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या आधी सोमवारच्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीला परवानगीच नाकारण्यात आली होती.

भाजपने या पोस्टर हटविण्याच्या घटनेवर ममता सरकारवर जोरदार टीका केली आहे. बंगालमध्ये लोकशाहीची हत्या केली जात असल्याची टीका भाजपने केली आहे. या घटनेनंतर तृणमूल काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये जोरात भांडण सुरु झाले. भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी या घटनेला लोकशाहीची हत्या असे म्हंटले आहे. सरकारी यंत्रणेचा वापर भाजपच्या विरोधात केला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

बंगालमध्ये आतापर्यंत सहा टप्यात मतदान झाले असून प्रत्येक टप्यात हिंसा झाली आहे. या निवडणुकीत बंगालमध्ये राजकीय विवाद वरच्या पातळीवर गेले आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोचे आयोजन आज कोलकत्यात करण्यात आले होते. परंतु, रोडशोच्या आधीच अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो हटविण्यात आले.

हि तर लोकशाहीची हत्या; भाजपचा आरोप
बंगालमध्ये १५ मे रोजी योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ती रॅली देखील रद्द करण्यात आली. भाजप उमेदवार भारती घोष आणि बाबुल सुप्रियो यांच्या गाडीवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या आधी अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरला जाधवपूर लोकसभा मतदारसंघातील बरुईपूर येथे उतरण्यास ममता सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली होती. ‘हे राजकीय शत्रुत्व महागात पडेल, दीदी’ असे ट्विट भाजप महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like