त्यांच्यावर ७२ तासांची नाही ७२ वर्षांची बंदी घातली पाहिजे : अखिलेश यादव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ७२ तासांची नाही ७२ वर्षांची बंदी घातली पाहिजे. अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान काल पूर्ण झाले आहे. याचदरम्यान, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ‘विकास’ विचारत आहे. पंतप्रधानाचे लाजिरवाणे भाषण ऐकले का? “सवा सौ करोड़” देशावासियांचा विश्वास गमावून आता त्यांनी बंगालमधील ४० आमदारांचे तथाकथित पक्षांतराच्या अनैतिक विश्वासापर्यंत संक्षिप्त केले आहे. ही काळ्या पैशांची मानसिकता बोलत आहे. यासाठी त्यांच्यावर ७२ तासांची नाही तर ७२ वर्षांची बंदी घातली पाहिजे. असे अखिलेश यादव यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, अखिलेश यादव उत्तर प्रदेशातील आझमगड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरोधात भाजपाकडून भोजपुरी सुपरस्टार निरहुआ उर्फ दिनेशलाल यादव निवडणुकीच्या रिंगणात आहे.