स्वतःला खालच्या जातीचा म्हणणाऱ्या मोदींनी मागासवर्गीयांना काय दिले ? : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मी मागासवर्गीय असल्यामुळेच काँग्रेसने मला जातीवाचक शिव्या दिल्या असे नरेंद्र मोदी यांनी म्हंटले. १५ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. ५ वर्ष देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी मागासवर्गीयांना काय दिले? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण होणार आहे. याचदरम्यान, माढा येथील वंचित बहुजन आघडीचे उमेदवार विजय मोरे यांच्या प्रचारार्थ अकलूज येथे प्रकाश आंबडेकर यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी मी मागासवर्गीय असल्यामुळेच काँग्रेसने मला जातीवाचक शिव्या दिल्याचे म्हटले होते. पण, आता काँग्रेस मागासवर्गीयांना चोर म्हणत असून मी ते सहन करणार नाही, असे म्हणत माढ्यातील सभेत मोदींनी ओबीसी कार्ड वापरले होते. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले. याचबरोबर मोदींना शाळा सोडल्याचा दाखला प्रसिद्ध करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

इतकेच नव्हे तर, नरेंद्र मोदी १५ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. ५ वर्ष देशाचे पंतप्रधान होते. मात्र त्यांनी मागासवर्गीयांना काय दिले? मागासवर्गींयांना काय मिळाल? असा सवालही त्यांनी काय केला. तासेच मोदींवर निशाणा साधत त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले.

Loading...
You might also like