‘खरं काम करणाऱ्यांवर चिडतात खरं बोलणारे लोक’, PM मोदींचा टिका करणाऱ्यांवर ‘निशाणा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि कलम 370 रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका करणार्‍यांवर जोरदार हल्ला केला. पीएम म्हणाले, योग्य बोलणारे टिकाकार योग्य काम करणारे आणि कोंडी फोडणार्‍यांचा द्वेष करतात. आपल्या टिकाकारांवर आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमात म्हणाले, ’योग्य बोलणारी’ गँग जगभरातील प्रवाशांच्या अधिकाराची वकिली करते, परंतु शेजारी देशातील त्रस्त अल्पसंख्यांना नागरिकत्व देण्यावर भारताच्या विरोधात उभी आहे.

पंतप्रधानांनी म्हटले की, ही गँग संविधानाची गोष्ट करते, परंतु जम्मू-काश्मिरमध्ये कलम 370 रद्द केल्याने आणि तेथे भारतीय संविधान पूर्णपणे लागू करण्यास विरोध करते. योग्य बोलण्यात काहीच वाईट नाही. परंतु हे लोक योग्य काम करणार्‍यांचा द्वेष करतात. ते म्हणाले, जे लोक स्वत:ला लैंगिक न्याय करणारे मानतात ते तीन तलाक कायद्याच्या विरोधात आहेत. जे लोक न्यायाबाबत बोलतात ते आपल्या मनासारखी एखादी गोष्ट नसल्यास सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्यास मागेपुढे पाहात नाहीत.

पंतप्रधान म्हणाले, 2014 मध्ये त्यांचा पक्ष जेव्हा सत्तेत आला होता, तेव्हा त्यांच्यासमोर दोन पर्याय होते, जुन्या मार्गावरून जाणे आणि नवे दृष्टीकोण घेऊन नव्या मार्गाने जाणे. पक्षाने लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या मार्गावर चालण्याचा पर्याय निवडला. सरकारसाठी राष्ट्र निर्माण विकास, सुशासन अणि सुविधा हा विश्वासाचा विषय आहे. पंतप्रधान म्हणाले, जागतिक अर्थव्यवस्था अडचणीतून जात आहे, परंतु भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आणि धोरणे स्पष्ट आहेत, जे पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट साध्य करण्यास मदत करेल. आपल्या सरकारची कामे सांगताना पंतप्रधान म्हणाले, त्यांचे सरकार दररोज 30 किलोमीटर हायवेची निर्मिती करत आहे, जो यापूर्वी 12 किलो मीटर होत होता. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजनेतून सरकार अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवत आहे.