मोदींची सेलिब्रेटींना मतदानासाठी विनंती, मतदान करा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०१९ च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे . ११ एप्रिल ते १९ मे पर्यंत देशात लोकसभेच्या निवडणुकांचे वातावरण असणार आहे. या निवडणुकांमध्ये प्रत्येक व्यक्तीचे मत महत्त्वाचे असते. एक मतानेही सरकार बदलू शकते. त्यामुळे आता देशातील सर्वच राजकारणी लोकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्वीटर हँडरवरून देशातील जनतेला मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे. जनतेला मतदानासाठी जागरूक करण्यासाठी मोदींनी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना मदत मागितली आहे. राजकारणातील दिग्गज नेत्यांना, बॉलिवूडमधील मोठे कलाकार, खेळाडूंना वेगवेगळ्या पद्धतीने मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे.

अभिनेत्री दिपीका पादूकोन, आलिया भट्ट, अक्षय कुमार, वरूण धवन, सलमान खान, शाहरूख खान, यांच्यासह अनेक कलाकारांना टॅग करत त्यांना मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे. तसंच लोकांमध्ये मतदानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आवाहन केले आहे.

देश तुम्हाला पाहतो, ऐकतो, आणि मला माहित आहे, लोक तुम्ही सांगितलं तर ऐकतील. मला वाटते तुम्ही लोकांना जागरूक करावे. मतदान हा फक्त एक अधिकार नाही तर एक कर्तव्य आहे.

दरम्यान, प्रसिद्ध सेलिब्रेटींसह इतर क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींना त्यांनी आवाहन केले आहे. त्यात भूमि पेडनेकर, आयुष्यमान खुराणा, पद्मश्री मनोज वाजपेयी, गायक शंकर महादेवन, एम. एस. धोनी, विराट कोहली, उद्योजक रतन टाटा, आनंग महिंद्रा, सानिया मिर्झा यांच्या सह अनेकांना मोदींनी आवाहन केले आहे.