‘मोदींना भारतात ‘पबजी’वर बंदी आणायची आहे मात्र…’ काँग्रेसचा सरकारला टोला

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पबजी लोकप्रिय मोबाइल गेमवर बंदी आणायची आहे. मात्र असे केल्यास नोकर्‍यांची मागणी वाढेल असे ट्विट काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी केले आहे. भारत सरकारने बंदी घातलेल्या नव्या 47 अ‍ॅपच्या यादीमध्ये पबजीचा समावेश नाही. मात्र आधीच 59 आणि त्यात नव्याने 47 अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर पबजीवरील बंदीसंदर्भातील चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर सिंघवी यांनी पबजी बंदीचा संबंध बेरोजगारीशी लावला आहे.

सरकारने 47 अ‍ॅपवर बंदी आणल्यानंतर यामध्ये पबजीचा समावेश नसल्यासंदर्भात सोशल मिडियावर चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यावरुन काँग्रेस नेत्याने मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकराने बेरोजगारीसारखा महत्वाचा प्रश्न गंभीर बनू नये म्हणून पबजीवर बंदी घातली नाही असा उपहासात्मक टोला सिंघवी यांनी लगालवा आहे. मोदीजींना पबजीवर खरोखरच बंदी आणायाची आहे. मात्र तरुणांचे या आभासी जगामुळे लक्ष विचलीत झाले नाही तर ते खर्‍या आयुष्यामध्ये नोकर्‍यांची मागणी करतील आणि त्यामधून अडचणीन निर्माण होतील हे मोदींना लक्षात आले. असे ट्विट सिंघवी यांनी केले आहे.