PM मोदींनी केलेलं ‘ते’ वक्तव्य पाकिस्तानला ‘झोंबलं’, PAK च्या प्रवक्ता आयशा फारुकी म्हणाल्या…

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – युद्धाच्या स्थितीमध्ये पाकिस्तान भारतासमोर दहा दिवसांपेक्षा अधिक काळ टिकू शकणार नाही या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर पाकिस्तानने आक्षेप नोंदवला आहे. काश्मीरमधील सध्याचे वातावण आणि दोन अणुअस्त्र संपन्न देशांमध्ये असलेला तणाव लक्षात घेता असे वक्तव्य करणे गैर जबाबदार पणा असल्याचे पाकिस्तानकडून म्हणण्यात आले आहे. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या आयशा फारूकी यांनी बुधवारी म्हंटले की, पाकिस्तान भारतीय पंतप्रधानांचे वक्तव्य फेटाळून लावत आहे. तसेच भाजप सरकार आणि त्यांच्या नेतृत्वाने असे वक्तव्य केवळ त्यांच्या देशात त्यांच्यावरच होणाऱ्या टिकेवरून लक्ष हटवण्यासाठी केले असल्याचे देखील फारुकी यांनी म्हंटले आहे.

फारुकी यांनी मोदींचे हे वक्तव्य भडकावू असल्याचे सांगितले आणि पाकिस्तानचे भाजप संबंधीचे जुने विचार कसे होते याची आठवण देखील करून दिली. त्या म्हणाल्या, पाकिस्तानी सशस्त्र सेना आणि लोकांकडून त्यांचे कोणतेही आक्षेपार्ह कामकाज प्रभावीपणे रोखण्याचा संकल्प कोणालाही कमी वाटू नये.

यावेळी फारुकी यांनी बालाकोट येथे भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचा उल्लेख केला ज्यामध्ये भारताने अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तसेच त्यांनी हे देखील सांगितले की त्यानंतर केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानने भारतीय विंग कमांडर अभिनंदनला पकडले होते.