इराणमध्ये अडकलेल्या कांव्याननं केलं PM मोदींना मदतीसाठी ‘आवाहन’, म्हणाला – ‘माझ्या आई-वडिलांना बाहेर काढा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना हा १०० दिशांमध्ये पसरला असून ४३०० पेक्षा जास्त लोक या विषाणूच्या संसर्गामुळे मरण पावले आहेत. या पार्श्वभूमीवर विविध देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला असून तेहरानमध्ये अडकलेल्या एका भारतीय तरुणाने भारतीय दूतावासाकडे (Indian embassy) मदतीची मागणी केली आहे.

कांव्यान शाह असं इराणमधील तेहरानमध्ये अडकलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या १० दिवसांपासून हा तरुण तेहरानमधील भारतीय दूतावासाकडे भारतात परत जाण्यासाठी मदत मागत असून त्याच्यासोबत त्याचे आई-वडीलही आहे. पश्चिम आशियातील इराण हा सर्वाधिक कोरोनो बाधित देश असून आतापर्यंत येथे या विषाणूमुळे ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.

कांव्यान याने एक व्हिडीओ समाज माध्यमावर उपलोड करीत भारतीय दूतावास कोणत्याही प्रकारची मदत करीत नसल्याचा आरोप त्याने केला. कांव्यान शहाने तब्बल २००० भारतीय इराणमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली आहे. त्याच्याकडील पैसेही संपत असल्याने यापुढे इराणमध्ये राहणे अवघड जात आहे. माझे आई-वडील जेष्ठ नागरिक असून त्याच्या जीवाला धोका असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे. या व्हिडीओ मध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदतीचं आवाहन केलं आहे.