‘मोदीजी सीमा खुली करा, मला लग्न करायचे आहे’, पाकिस्तानातील तरुणीचे आवाहन

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पाकिस्तानी महिलेने भारतीय तरुणांशी लग्न करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे. यासाठी महिलेने मोदींना सीमा खुल्या करण्यास सांगितल्या आहे. जेणेकरून ती भारतात येऊन ठरलेल्या दिवशी विवाह करू शकेल.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तानमधील ठरलेल्या लग्नांवरही बंदी आहे. सध्या दोन हिंदू कुटुंबे लॉकडाऊन संपण्याच्या प्रतीक्षेत आहेत. युहानाबाद येथील लाहोर येथील रहिवासी असलेल्या पाकिस्तानमधील समायला (वय 35) युहानाबाद लाहोर येथे राहणारी आहे.

तिचा साखरपुडा कमल कल्याण (मधूबन कालोनी, जालंधर) यांच्यासह 2015 मध्ये झाला होता. कमल यांचे वडील ओम प्रकाश यांनी समायलाच्या पुर्ण कुटुंबीयांच्या भारत व्हिसासाठी दस्तावेज तयार करुन दिले होते. मात्र लॉकडाऊनमध्ये त्यांचा पाठवता आले नाही. यामुळे लग्नही होत नाही.

समायलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विदेश मंत्री यांच्याकडे निवेदन केलं आहे की त्यांनी पाकिस्तान स्थित भारतीय उच्चायुक्त यांना यासंदर्भातील निर्देश जारी करावे. पाकिस्तानी हिंदू मुलींचं लग्न भारतात होणार आहे, त्यांना भारताचा व्हिसा जारी केला जावा, असे निवेदन तिने केले आहे.