मोदींच्या ‘अब की बार, ट्रम्प सरकार’ वरून चुकीचा अर्थ न काढण्याचे आवाहन

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार ट्रम्प सरकार अशी घोषणा दिली होती. त्यामुळे भारत अमेरिकेतील निवडणुकामध्ये हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप होऊ लागल्याने परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना खुलासा करावा लागला आहे. त्यांनी सांगितले की, आमचा दृष्टीकोन साफ असून या देशात जे काही होत आहे. ती त्यांची राजनिती आहे. आमची नाही. पंतप्रधान मोदी यांच्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकेचा दौरा केला. त्यात ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पही सहभागी झाले होते. त्यावेळी मोदी यांनी भारतातील घोषणेप्रमाणे अब की बार ट्रम्प सरकार अशी घोषणा दिली होती. या घोषणेचा वापर डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुक प्रचारात करण्यात येऊ लागला.

अमेरिकेत २०२० मध्ये राष्ट्रपती निवडणुक होत आहे. या घोषणेचा उपयोग ट्रम्प च्या उमेदवारीच्या समर्थनार्थ केल्या जाणाऱ्या घोषणांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे भारत अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी वॉशिंग्टनमध्ये पत्रकार परिषदेत याचा खुलासा केला.

त्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या राजनितीमध्ये भारत कोणा एकाचा पक्ष घेत नाही. पंतप्रधान यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नये. पंतप्रधानांनी मागच्या निवडणुकीच्या संदर्भात बोलत होते.

Visit : policenama.com