रूपयापेक्षा जास्त वेगाने ढासळतेय मोदींची प्रतिमा : मुकूल वासनिक

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन

राफेल घोटाळा, महागाईमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा रूपयापेक्षा जास्त वेगाने ढासळत आहे. यूपीए सरकारच्या काळात ५०० कोटी रुपयांचे एक विमान विकत घेण्याचे ठरले होते. मात्र, मोदी सरकारने १६०० कोटींपेक्षा जास्त किंमतीत एक विमान विकत घेतले आहे. वायुसेनेने १३६ विमानांची आवश्यकता असल्याचे सांगितल्यावरही केवळ ३६ विमानांची खरेदी केली जात आहे, असे मुकूल वासनिक म्हणाले. ते काँग्रेसच्या एल्गार मोर्चात बोलत होते.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’926983f5-b669-11e8-b075-5315026ab2f8′]

मोर्चाच्या सुरुवातीला येथील गर्दे हॉलमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे होते. व्यासपीठावर आमदार राहुल बोंद्रे, प्रसेनजीत पाटील, बलदेवराव चोपडे यांच्यासह काँग्रेसच्या वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी वासनिक म्हणाले, राफेल विमान खरेदीबाबत मोदी सरकारने देशासमोर सर्व तथ्य आणावे. यूपीए आणि मोदी सरकारच्या काळात राफेल विमान खरेदीत ४१ हजार कोटींची तफावत आहे. मोदींनी चार वर्षांत एकही आश्‍वासन पाळलेले नाही. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव ढासळत असताना पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला पोहचले आहेत. ज्या प्रमाणात रुपया ढासळत आहे त्याच्या अनेक पटींनी मोदींची प्रतिमा ढासळत आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित नाही.
[amazon_link asins=’B01MU4PM6P,B00SAX9X6G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’467ac6e4-b66a-11e8-8a67-7b6cedc76e6f’]

देशाच्या सर्वोच्च सुरक्षेशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा.अनेक तडजोडी करून हुकूमशाही पध्दतीने केलेला राफेल करार म्हणजे जनतेच्या पैशांवर दिवसाढवळ्या घातलेला दरोडा आहे, असे वासनिक म्हणाले. या सभेनंतर मोर्चा कारंजा चौकातून जनता चौक, बाजार लाईन, जयस्तंभ चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला.

राम मंदिराबाबत भाजपची भूमिका दुटप्पी : प्रविण तोगडिया