लोकसभा २०१९ : असा असेल मोदींच्या सभांचा झंझावात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. २०१९ च्या आगामी लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत , तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. लोकसभेची आगामी निवडणूक लढविण्यासाठी भाजपने मोदींच्या सभेचा एक मास्टर प्लॅन तयार केला आहे.
असा आहे मोदींच्या सभेचा प्लॅन – सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , मागच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची जादू मोठ्या प्रमाणात चालली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी देशभरात जवळपास २०० सभा घेणार आहेत. नरेंद्र मोदी तीन लोकसभा मतदारसंघात मिळून एक मोठी सभा घेतील. प्रचारसभांशिवाय देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये मोदींकडून रोड-शो करण्यात येईल.

उत्तर प्रदेश व  पश्चिम बंगालवर विशेष फोकस – लोकसभेसाठी मोदी विशेष करून उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये या राज्यांवर फोकस करणार आहेत. उत्तर प्रदेशात मोदी तब्बल २५ प्रचारसभा घेणार आहेत. उत्तर प्रदेशसोबत पश्चिम बंगाल हेही राज्य भाजपसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींचा राज्यात सत्ता काबीज करण्यासाठी मोदींकडून जोरदार प्रयत्न होणार आहेत. नरेंद्र मोदी  पश्चिम  बंगालमध्ये १५ प्रचारसभा घेतील.

२०१४ ची परिवर्तन करणारी मोदी लाट –
नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या विरोधात आलेली असंतोषाची लाट आपल्या खुबीने मोदी लाटेत बदलून घेण्यात यश मिळवले होते . त्यांच्या नेतृत्व मोदींनी २०१४च्या निवडणुकीत एकूण ५,८२७ कार्यक्रम केले ज्यात ४३७ विराट सभांचा समावेश होतो. नरेंद्र मोदींनी कश्मीर ते कन्याकुमारी आणि आसाम अरुणाचल पासून गोवा महाराष्ट्र पर्यत संबंध देशभर या विशाल सभा घेतल्या होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी सोशल मीडियाचा प्रभावी वापर भाजपाकडून करण्यात आला होता. नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी भाजपा समर्थकांनी #ComeAgainModiji हा ट्विटर ट्रेंड सुरु केला आहे.

मतदान करा, नरेंद्र मोदींचं ब्लॉगद्वारे आवाहन – लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या आहेत. मतदानासाठी आता महिनाभरापेक्षा कमी काळ उरला आहे. हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मतदारांना, विशेषतः तरुणाईला ब्लॉगद्वारे आवाहन केलं आहे. मतदान ओळखपत्र मिळवणे आणि मतदान करणे ही अभिमानाची बाब आहे, असंही मोदींनी म्हटलं आहे.