ललित मोदीच्या पत्नीचे कॅन्सरने निधन; ट्विटरवर वाहिली श्रद्धांजली 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन-आयपीएल घोटाळ्यातील आरोपी ललित मोदी याच्या पत्नीचे निधन झाले आहे. पत्नीच्या निधनाची माहिती खुद्द ललित मोदीनेच ट्विटरवर भावनिक पोस्ट लिहीत दिली आहे. मीनल मोदी असे ललित मोदीच्या पत्नीचे नाव आहे. मिनल मोदीला गेल्या 20 वर्षांपासून कर्करोगाने ग्रासले होते. या आजारमुळेच तिचा मृत्यू झाला आहे. कर्करोगावर लंडनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. ललित मोदी आणि मिनल यांचा 1991 मध्ये विवाह झाला होता. त्यांच्या लग्नाला जवळपास 27 वर्षे झाली होती.

‘तू माझं प्रेम, जगणे आणि सहचारीणीही होतीस. तु तेथून आमच्याकडे पाहत असशील. तूच माझे आयुष्य होतीस आणि प्रवासही होतीस. तुला दिलेले वचन मी नक्की पूर्ण करेन. आपल्या मुलांची काळजी घेईल, त्यांचे पालनपोषण नीट करेल. या सर्वांत तू सोबत असशील याची खात्री आहे. पण हे सर्व कठीण असेल.’ अशी पोस्ट ललित मोदीने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आयपीएलमध्ये सर्वात मोठा घोटाळा केल्याप्रकरणी ललित मोदी मागील आठ वर्षांपासून भारतामधून फरार आहे.