नरेंद्र मोदी झाले दुसऱ्यांदा पंतप्रधान ; आनंदाच्या भरात ‘या’ भाजप नेत्याने केले लोकांचे ‘बूट पॉलिश’

मध्यप्रदेश (इंदौर) : वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी दुसऱ्या वेळेस पंतप्रधान झाल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच वातावरण आहे. पण मध्यप्रदेशमधील इंदौरचे भाजप जिल्हा परिषद सदस्य संजय कटारिया यांनी वेगळ्याच अंदाजात हा आनंद साजरा केला आहे. इंदौर शहरातील एका चौकात बसून सामान्य लोकांच्या बुटांची पाॅलिश करून त्यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्याचा आनंद साजरा केला आहे तसेच लोकांचे आभारही मानले आहेत.

कटारिया म्हणाले की, मोदीजी म्हणाले होते की नेत्यांनी व्हीआयपी संस्कृती सोडून सामान्य लोकांप्रमाणे सामान्य लोकांची सेवा केली पाहिजे. मोदींनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या गाडीवरून लाल दिवा काढून टाकला आहे, आम्ही मोदींचा हा संदेश जनतेपर्यंत घेऊन जात आहोत.

यांमुळेच कटारिया यांनी जनतेचे आभार मानून या मोहिमेची सुरवात केली आहे. संजय कटारिया यांच्या या हटके कृतीला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.

संजय कटारिया यांच्या या कृत्यावर उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांनी त्यांचे कौतुक केले आहे तर काहींनी त्यांना त्यांच्या वार्डातील समस्यांकडे लक्ष देण्याची सूचना केली आहे. संजय कटारिया यांची बूट पोलिश करत असलेले फोटो व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे.