Moeen Ali | CSK साठी आनंदाची बातमी; चेन्नईच्या ‘या’ सुपर स्ट्रायकरला मिळाली भारतात एन्ट्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Moeen Ali | आयपीएलच्या 16 सीझनला सुरू होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. मात्र पहिला सामना असणाऱ्या चेन्नई (CSK) संघात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आता चेन्नईचा कर्णधार नसून आता रविंद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चेन्नई संघासाठी हा दुसरा धक्का आहे. मात्र एक दिलासादायक माहिती समोर येत आहे ती म्हणजे चेन्नईचा अष्टपैलू विदेशी खेळाडू मोईन अलीला (Moeen Ali) परवानगी मिळाली असून तो लवकरच भारतात येणार आहे.

गेल्या सीझनमध्ये चेन्नई संघाला विजेतेपद जिंकवून देण्यात मोईन अलीचा मोलाचा वाटा होता. यंदाच्या मोसमात मोईनला व्हिसा (Visa) मिळत नसल्याने अडचण येत होती. मात्र आता त्याला सर्व कागदपत्रे मिळाली असून तो लवकरच संघासोबत सामील होणार आहे. मात्र तरीही मोईनला (Moeen Ali) पहिला सामना खेळता येणार नाही.

मोईन भारतात आल्यानंतर त्याला तीन दिवस आयसोलेशनमध्ये (Isolation) रहावं लागणार आहे. त्यामुळे मोईन थेट 31 मार्चला लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात दिसणार आहे. चेन्नईसमोर अनेक अडचणी आहेत यामधील सर्वात महत्त्वाची म्हणजे स्टार गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) दुखापतीमुळे बाहेर आहे.

दरम्यान, महेंद्र सिंह धोनीने कर्णधारपद सोडल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
मात्र धोनी संघात असल्याने जडेजाला फार मोठा फायदा होणार आहे.
धोनीच्या अनुभवाचा फायदा घेत जडेजा संघाला कितपत यश मिळवून देतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

Web Title :- Moeen Ali | ipl-2022-moeen ali recieved his visa will be available for csk 2nd game


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | मोदी सरकारने दिले फिटमेंट फॅक्टरबाबत मोठे अपडेट ! इतकी वाढू शकते सरकारी कर्मचार्‍यांची बेसिक सॅलरी

Republican Party | पुणे शहरातील समस्यावर रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट

Samantha Ruth Prabhu Viral Video | आजपर्यंत समंथाची ही बाजू कोणालाच नव्हती ठावूक, अखेर व्हिडिओमुळे झाला खुलासा

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 9000 रुपयांची लाच स्विकारताना उप कोषागार अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Ajit Pawar | ‘गुस्सा क्यू आता है..!’ अजित पवारांनी प्रवीण दरेकरांची उडवली ‘खिल्ली’