ताज्या बातम्या

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! ‘ही’ योजना 2024 पर्यंत सुरू राहणार; जाणून घ्या कोणाला होणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. कॅबिनेटने पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण म्हणजे पीएमएवाय-जी (Pradhan Mantri Awaas Yojana – Gramin) मार्च 2024 पर्यंत जारी ठेवण्यात मंजूरी दिली आहे. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (anurag thakur) यांनी कॅबिनेटच्या निर्णयाची माहिती दिली. (Modi Government)

 

केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले की, 2016 मध्ये ग्रामीण भागात सर्वांना घर या उपक्रमाचा आढावा घेण्यात आला होता की, 2.95 कोटी लोकांना पक्क्या घरांची आवश्यकता आहे. यामध्ये मोठ्या संख्येत कुटुंबांना घरे देण्यात आली आहेत.

 

ठाकुर म्हणाले, उर्वरित कुटुंबांना सुद्धा घरे मिळू शकतील, यासाठी ही योजना 2024 पर्यंत जारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी वक्तव्यानुसार, या योजनेंतर्गत उर्वरित 1.55 कोटी घरांच्या बांधकामासाठी 2.17 कोटी रुपये येतील.

ज्यामध्ये केंद्राची भागीदारी 1.25 लाख कोटी रूपये तसेच राज्याची भागीदारी 73,475 कोटी रूपये असेल. या अंतर्गत नाबार्डला अतिरिक्त व्याजाच्या परतफेडीसाठी 18,676 कोटी रूपयांची अतिरिक्त गरज असेल.

 

केन-बेतवा प्रोजेक्ट होईल लिंक

याशिवाय मोदी सरकारने (Modi Government) केन-बेतवा लिंक प्रोजेक्टला मंजूरी दिली आहे. अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, 44,605 कोटी रुपयांच्या खर्चाचा केन बेतवा नदीजोड प्रकल्प 8 वर्षात पूर्ण केला जाईल. या राष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये केंद्र सरकारचे योगदान 90 टक्के असेल.

 

Web Title :- Mogi Government | Modi cabinet approves extension of pradhan mantri awaas yojana gramin till march 2024

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 58 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding | तुम्ही सुद्धा पाहू शकता कॅटरीना कैफ आणि विक्की कौशलचा विवाह, परंतु… जाणून घ्या सर्वकाही

Malaika Arora | ट्रान्सपरंट ड्रेस परिधान करुन मलायका पोहोचली ‘शो’वर, दाखवल्या अदा; व्हिडीओ तुफान व्हायरल

Pune Crime | पुण्यात देहूरोड पसिरात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; विदेशी तरुणीसह 10 जणींची सुटका

Stock Market | गुंतवणुकदार झाले मालामाल! 15 मिनिटात कमावले 2.75 लाख कोटी रुपये, सेन्सेक्समध्ये 800 पॉईंटची वाढ

Kolhapur Crime | ‘आई, घरी सोडतो’ असं म्हणत महिलेला गाडीत बसवलं, काही अंतर गेल्यानंतर दाम्पत्याने महिलेसोबत केला भयंकर प्रकार; कोल्हापुरातील खळबळजनक घटना

PMSBY | पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ! एक रुपयाची छोटी गुंतवणूक तुम्हाला देऊ शकते 2 लाखापर्यंतचा मोठा फायदा, जाणून घ्या कसे?

 

Back to top button