गावठी पिस्तूलासह तरुण गजाआड

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील मोहाडी उपनगर भागात एका तरुणाकडून मोहाडी पोलिसांनी एक गावठी पिस्तूल जप्त केले असून त्याला अटक करण्यात आली आहे.

सनी उर्फ विजय भगवान चौधरी (वय.२६, रा.एकता नगर स्टेशन रोड.धुळे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण संशयितरित्या पिस्तूल घेऊन फिरत आहे. अशी माहिती मोहाडी पोलीसांना मिळाली. त्याआधारे पोलीस मोहाडी भागात गस्त घालत असताना भिंतीच्या आडोशाला एक तरुण दिसला. त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी करत अंगझडती घेतली.

त्यानंतर त्याचे राहते घरात झडती घेतल्यावर एका पेटीत लपविलेले एक गावठी पिस्तुल मिळून आले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखळ करून त्याला अटक केली असून गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे