‘दहशतवादी देश सोडला पाहिजे’ हे Twit लाईक केल्यामुळे पाकिस्तानचा हा गोलंदाज ‘गोत्यात’

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – नुकतेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला २७ वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला आता ब्रिटनचा व्हिसा पाहिजे. आणि त्याला ब्रिटनमध्येच राहायचे आहे. आमिरची पत्नी ब्रिटनची नागरिक आहे. तिने या याआधीच स्पाऊस व्हिसासाठी अर्ज केला आहे.

याच दरम्यान, मोहम्मद आमिरने एका ट्विटला लाईक केल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले. पाकिस्तानी पत्रकार सादिक यांनी एका ट्विटमध्ये लिहिले कि, मला कळत नाही की आमिरच्या ब्रिटिश पासपोर्ट संबंधी करण्यात आलेल्या अर्जाला जास्तीचे महत्व दिले जात आहे. त्याला असा अर्ज करण्याचा पूर्ण हक्क आहे. याचा अर्थ असा नाही की तो पाकिस्तानसाठी खेळणे बंदच करेल.

यानंतर त्याच्या एका चाहत्याने लिहिले की, माझं मत आहे की मोहम्मद आमिरने दहशतवादी देश सोडला पाहिजे. मोहम्मद आमिरने या चाहत्याचे हे ट्विट लाईक केले. यानंतर हा वाद निर्माण झाला. यानंतर या प्रकरणावरून वाद होण्याची शक्यता लक्षात घेता आमिरने हे ट्विट अनलाइक केले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. मोहम्मद आमिरने हे वादग्रस्त ट्विट  लाईक केल्यावर त्याचा स्क्रीन शॉट काढण्यात आला. हा स्क्रिनशॉट सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल झाला. आमिरने ते ट्विट लाईक केल्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी त्याच्यावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून जोरदार टीका केली. वसीम अक्रमने म्हंटले की, आमिरने एवढ्या लवकर निवृत्ती घ्यायला नाही पाहिजे होती.

आरोग्यविषयक वृत्त