Coronavirus : मोहम्मद कैफनं ‘मेणबत्ती’ लावल्यामुळं संतापले ‘मौलाना’, लावला बदनामीचा ‘आरोप’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर रविवारी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता मेणबत्ती लावली आणि कोरोना विषाणूविरूद्धच्या युद्धात पाठिंबा दर्शविला. मोहम्मद कैफ पत्नी पूजा कैफसह त्यांच्या घराच्या छतावर दिसले, जिथे त्यांनी मेणबत्ती लावली. मोहम्मद कैफने याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील शेअर केला आहे.

मोहम्मद कैफ यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कामगार, सरकारी कर्मचारी, पोलिस आणि लष्करी कर्मचारी, मीडिया कर्मचारी, बँक कर्मचारी आणि आवश्यक वस्तू विकणार्‍या दुकानदारांना सलाम. हा प्रकाश आपणा सर्वांसाठी. धन्यवाद.’ मोहम्मद कैफ यांनी कोरोना विषाणूविरूद्ध लढा देणाऱ्या सर्व योद्ध्यांचे आभार मानले आणि ते म्हणाले की आम्ही तुमच्या कर्जाखाली बुडालो आहोत.

कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता देशातील नागरिकांना आवाहन केले होते की, सर्वांनी आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करावेत आणि 9 मिनिटांसाठी हातात दिवे, मेणबत्ती अथवा मोबाईलचा फ्लॅश लावून आपल्या घरातील दारे किंवा बाल्कनीमध्ये उभे राहून कोरोनाविरूद्धच्या लढ्यात एकता दाखवावी.

मोहम्मद कैफचा हा प्रेमाचा संदेश काही कट्टरपंथी मुस्लिमांच्या पसंतीस पडला नाही. मोहम्मद कैफला मेणबत्त्या जाळताना पाहून ते संतापले आणि सोशल मीडियावर त्यांना धर्माचे ज्ञान शिकवू लागले. एका चाहत्याने तर कैफवर मुस्लिमांची बदनामी करण्याचा आरोप लावला आहे.

भारतात कोरोना विषाणूची संख्या सतत वाढतच आहे. आतापर्यंत भारतात 4000 हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. भारतात कोरोना विषाणूमुळे बळी पडलेल्या लोकांची संख्या 100 च्या पार पोहोचली आहे.